Home ताज्या बातम्या धोका वाढला! राज्यातल्या कोरनाबाधितांची संख्या 13 हजारांच्या जवळ | News

धोका वाढला! राज्यातल्या कोरनाबाधितांची संख्या 13 हजारांच्या जवळ | News


मुंबई 03 मे : महाराष्ट्रातला कोरोनाचा वेग कायम आहे. राज्यात आज 678 नवीन रुग्ण आढळून आलेत त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या 12974 एवढी झाली आहे. तर आज 27  रुग्णांचा मृत्यू झाला. आज 115 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय. आतापर्यंत 2115 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. रुग्णांचा मृत्यू आटोक्यात आणण्यासाठी सरकार अटोकाट प्रयत्न करत असून अनेक उपाय योजना करण्यात येत असल्याची माहिती दिली जात आहे.

मुंबईत आज 441 नवे कोरोना रुग्ण आढळले असून त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 8613 वर पहोचली आहे. म्हणजे राज्यातल्या कोरोनाबाधित 12974 पैकी तब्बल 8613 रुग्ण हे फक्त मुंबईतले आहेत. त्यामुळे मुंबईत जास्त प्रयत्नांची गरज असल्याचं बोललं जातंय.

आज कोरोनामुळे 21 लोकांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत मुंबईत एकूण 343 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 100 जण कोरोनमुक्त झाले असून आजवर 1804 पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत.

तर पुण्यात दिवसभरात ९९ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली.7 करोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला. करोनाचा संसर्ग झालेले ५५ रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण ४५१ रुग्णांवर उपचार करण्यात आले. ७५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

त्यामुळे पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या १८१८ एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत १०१ जणांचा मृत्यू झाला.

 

Tags:

First Published: May 3, 2020 10:44 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cm uddhav thackeray: चैत्यभूमीला घरातूनच अभिवादन करा – cm uddhav thackeray has appealed give tribute to dr babasaheb ambedkar on 6 december from home

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमहापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व...

Recent Comments