Home शहरं पुणे नदीपात्रात बुडूनबहिणींचा मृत्यू

नदीपात्रात बुडूनबहिणींचा मृत्यूम. टा. वृत्तसेवा, भोर

दोन सख्या बहिणींचा गुंजवणी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास भोर तालुक्यातील तेलवडी येथे ही घटना घडली.

पौर्णिमा रामदास धावले (वय १४) आणि श्रावणी रामदास धावले (वय १३, दोघी रा. तेलवडी) अशी मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. पौर्णिमा इयत्ता सहावीत आणि श्रावणी सातवीमध्ये शिकत होती. त्या आपल्या आई-वडिलांसमवेत नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी अचानक पौर्णिमाचा पाय घसरल्याने ती नदीत पडली. तिला वाचविण्यासाठी श्रावणीने हात पुढे केला. मात्र, तिही नदीत पडली. पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळे त्या पाण्यात वाहात गेल्या. त्यांना वाचविण्यासाठी वडिलांनी पाण्यात उडी मारली. परंतु, त्या सापडल्या नाहीत. पालकांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ जमा झाले. नदीत शोध घेऊन अर्ध्या तासाने दोघींना बाहेर काढण्यात आले. त्यांना नसरापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये नेले असता मृत घोषित करण्यात आले. राजगड पोलिस तपास करत आहेतSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

व्यापारी सासूरवाडीला गेला होता, फ्लॅटवर परतल्यानंतर दृश्य बघून हादरलाच

म. टा. प्रतिनिधी, : सासूरवाडीला गेलेल्या कापड व्यवसायिकाचे घर फोडून चोराने दोन लाखांची रोकड आणि दोन तोळ्याचे दागिने लांबविल्याची घटना सोमवारी (२३ नोव्हेंबर)...

oppo a15: ओप्पोचा हा बजेट स्मार्टफोन आणखी स्वस्त, कंपनीकडून मोठी कपात – oppo a15 gets a rs 1,000 price cut in india, know new...

नवी दिल्लीः ओप्पोने आपला बजेट स्मार्टफोन OPPO A15 च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. त्यामुळे या फोनची किंमत आता १० हजार रुपयांपेक्षा कमी...

Why Anti Love Jihad Law Proposed By UP and MP – ‘लव्ह जिहाद’ विरोधी कायदा का?

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश सरकार कथित 'लव्ह जिहाद'विरोधी कायदा करणार आहे. 'बेकायदा धर्मांतरविरोधी कायदा २०२०' असे या कायद्याचे नाव आहे. राज्याच्या गृह...

Recent Comments