Home मनोरंजन नवरात्री: Hema Malini Navratri Song : टाइम्स म्युझिकसोबत हेमा मालिनी यांनी शेअर...

नवरात्री: Hema Malini Navratri Song : टाइम्स म्युझिकसोबत हेमा मालिनी यांनी शेअर केलं विशेष नवरात्री ट्रॅक – hema malini navratri song with times music


मुंबई- टाइम्स म्युझिकने हेमा मालिनी यांच्या आवाजातील दुर्गा सप्तशतीच्या अत्यंत शक्तिशाली श्लोकांचा संग्रह ‘दुर्गा सप्तशलोकी’ सादर केला. अंजली दयाल यांनी संगीतबद्ध केलेले हे भक्तीगीत यंदा नवरात्रीत भाविकांसाठी खास शेअर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे हेमा मालिनी यांच्या ७३ व्या वाढदिवसाला हा संग्रह रिलीज करण्यात आला. हा ट्रॅक महिलांनी दिग्दर्शित केलं असून गायलंही महिलांनीच आहे.

टाइम्स म्युझिकच्या नवरात्रोत्सवाचा भाग म्हणून याचा एक व्हिडिओ प्रथमच समोर आला आहे. हेमा मालिनी यांच्या ‘जय अंबे गौरी आणि दुर्गा नामवली’ हे गाणं गायलं आहे. तर गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांच्या ‘दुर्गा कवच’ यांचा व्हिडिओही या उपक्रमाचा एक भाग म्हणून रिलीज करण्यात आला आहे.

या उपक्रमाबद्दल बोलताना हेमा मालिनी म्हणाल्या की, मी संस्कृत शिकली आहे आणि घरी दुर्गा सप्तशती वाचली आहे. टाइम्स म्युझिक आणि संगीतकार अंजली दयाल, तसंच व्हिडिओ दिग्दर्शक अनुराधा निषाद यांच्या ऑल-वुमन टीमसोबत दुर्गा सप्तशलोकी, दुर्गा नामवली हे गाण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. माझ्या वाढदिवसाला हे गाणं रिलीज करणं हा माझ्यासाठीचा एक आशीर्वादच आहे.

दुर्गा सप्तश्लोकी हे टाइम्स म्युझिकचं एक्सक्लूसिव रिलीज असून टाइम्स म्यूजिक आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर हे गाणं ऐकायला आणि पाहायला मिळेल.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Gujarat: Gujarat: पोलिसाला बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल – gujarat policeman beaten in ahmedabad

अहमदाबाद: गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे मंगळवारी रात्री चार ते पाच जणांच्या टोळक्याने एका पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. पोलिसावर...

Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांनी अमित शहांना दिली ‘ही’ उपमा – amruta fadnavis wishes union home minister amit shah on his birthday

मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आज वाढदिवस असून त्यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भाजपच्या नेत्यांनी सकाळपासून सोशल मीडियावर शहांचे अभिष्टचिंतन सुरू...

nashik corona update: जिल्ह्यात ५०२ रुग्ण; अकरा जणांचा मृत्यू – nagpur reported 502 new corona cases and 11 deaths in yesterday

म. टा. प्रतिनिधी, नाशिक गेल्या सात महिन्यांपासून करोनाने जिल्ह्यात घातलेले थैमान आता कुठे उतरणीला लागत असल्याची आशा काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या घटत्या संख्यावारीमुळे...

Recent Comments