Home मनोरंजन नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पुतणीने केली तक्रार: नवाजुद्दीनच्या पुतणीने केला लैंगिक अत्याचाराचा आरोप, तक्रार...

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या पुतणीने केली तक्रार: नवाजुद्दीनच्या पुतणीने केला लैंगिक अत्याचाराचा आरोप, तक्रार दाखल – nawazuddin siddiqui niece file complaint against actor brother of sexual harassment


नवाजुद्दीन सिद्दीकीची पुतणीने नवाजच्या दुसऱ्या भावावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. तिने दिल्लीतील जामिया पोलीस ठाण्यात काकाविरोधात तक्रार नोंदवली आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा ती अल्पवयीन होती. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली की, ‘काकाविरोधात मी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. त्यावेळी मी फक्त ९ वर्षांची होती.’

पुढे ती म्हणाली की, ‘जेव्हा मी दोन वर्षांची होते तेव्हा माझ्या आई- बाबांचा घटस्फोट झाला. लहान असल्यामुळे मला कळायचं नाही की ते माझे काका आहेत. पण जेव्हा मी मोठी झाले तेव्हा मला कळलं की हे वेगळ्या प्रकारची गोष्ट आहे. माझ्यासोबत हिंसाही झाली.’

लाइव्ह व्हिडिओ करून अभिनेत्रीने प्यायलं विष

शारीरिक हिंसेचे आहेत पुरावे-

नवाजच्या पुतणीने कोर्ट मॅरेज केलं. ती म्हणाली की, ‘लग्नानंतर आता माझ्या सासरच्यांनाही त्रास दिला जात आहे. यात माझे वडील आणि नवाज (मोठे बाबा) यांचाही सहभाग आहे. त्यांनी माझ्या सासरच्यांवर खोटे आरोप केले आहेत. जर त्यांनी तेव्हाच कठोर पाऊलं उचलली असती तर ही वेळ आलीच नसती. आताही दर सहा महिन्यांनी ते आमच्याविरोधात तक्रार नोंदवतात आणि मला खात्री आहे की माझ्या या तक्रारीनंतर ते परत काही ना काही करतील. यासर्वासाठी माझ्या नवऱ्याचा मला खंबीर पाठिंबा दिला. शारीरिक हिंसेचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत जे मी नवऱ्याला पाठवले होते.’

करोना पॉझिटिव्ह अभिनेत्री म्हणते, ‘झोप येत नाही’

नवाजुद्दीन सिद्दीकीनेही केली नाही मदत-

नवाजुद्दीननेही या प्रकरणी कोणती मदत केली नसल्याचं सांगितलं. ‘मोठ्या बाबांनी मला एकदा विचारलं होतं की आयुष्यात पुढे काय करायचं आहे. तेव्हा मी त्यांना माझ्यासोबत झालेल्या घटना सांगितल्या. त्यावर ते म्हणाले की असं काही नाहीये. मला वाटलं की किमान मोठे बाबा तरी मला मदत करतील. कारण त्यांनी वेगळं जग पाहिलं आहे. त्यांचे विचार वेगळे असतील पण मोठे बाबा मलाच म्हणाले की, ते काका आहेत. असं कधी नाही करणार.’Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

micromax in note 1: Micromax IN Note 1 चा पहिला फ्लॅश सेल आज, जाणून घ्या किंमत-ऑफर्स – micromax in note 1 to go on...

नवी दिल्लीः भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सकडून नुकतेच दोन डिव्हाइस Micromax In Note 1 आणि Micromax In 1B लॉन्च करण्यात आले आहे. जवळपास दोन...

उचित संधी

आंतरराष्ट्रीय आर्थिक स्थैर्य साध्य करण्याच्या हेतूने गेली दोन दशके कार्यरत असलेल्या या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या ताज्या अधिवेशनात करोनाचे थैमान आणि कोलमडलेल्या हे...

Deepesh Sawant’s Allegations Are False, NCB Tells To Bombay High Court – सुशांतसिंह आत्महत्या: दीपेश सावंतचे ‘ते’ आरोप खोटे?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई'अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा मदतनीस दीपेश सावंत याने एनसीबीवर केलेले आरोप खोटे आहेत. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा चौकशीसाठी बोलावले...

Recent Comments