Home मुंबई नवी मुंबई नवी मुंबईतील रुग्णसंख्या दीड हजारांवर

नवी मुंबईतील रुग्णसंख्या दीड हजारांवरशनिवारी आढळले ७४ रुग्ण; दोघांचा मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात शनिवारी करोनाचे नवे ७४ रुग्ण आढळून आल्याने करोनाबाधितांची एकूण संख्या १५६१ झाली आहे. तर, उपचार सुरू असलेल्या करोनाबाधितांपैकी दोघे शनिवारी मृत पावल्याने नवी मुंबईत आतापर्यंत एकूण ५१ रुग्ण करोनाचे बळी पडले आहेत. तर, अद्याप १०७१ नागरिकांचे करोना चाचणी अहवाल प्रलंबित आहेत. शनिवारी १०२ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने उपचाराअंती बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७२२ झाली आहे. तर, सद्यस्थितीत उपचार सुरू असलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या ७८८ आहे.

नवी मुंबईत शनिवारी आढळून आलेल्या ७४ रुग्णांमध्ये बेलापूर-६, नेरूळ- ९, वाशी-७, तुर्भे- २४, कोपरखैरणे-८, घणसोली-१३, व ऐरोली-९ येथील रुग्णांचा समावेश आहे. नवी मुंबईत कोविड १९ची चाचणी केलेल्या नागरिकांची संख्या ९९४३ झाली असून त्यापैकी पॉझिटिव्ह १५६१ तर निगेटिव्ह ७३११ रुग्ण आढळून आले आहेत. तर १०७१ रुग्णांचा तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहे. महापालिकेच्या कोविड १९ रुग्णालयात नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ९१ करोनाबाधित रुग्ण उपचारार्थ दाखल आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

padma awards 2021: पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील ६ जणांचा गौरव, सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणेंचा समावेश – padma awards 2021 sindhutai sapkal and girish...

नवी दिल्लीः प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील एकूण सहा जणांचा समावेश आहे. सिंधुताई सपकाळ आणि गिरीश...

bike-truck accident in nashik: साक्री-शिर्डी मार्गावर अपघातांची मालिका – two wheeler bike rider died in road accident in nashik

म. टा. वृत्तसेवा, सटाणासाक्री-शिर्डी या राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून सलग तिसऱ्या दिवशी ट्रॅक्टर-दुचाकी मोटारसायकलचा समोरासमोर अपघात होवून दुचाकी चालक समीर पप्पू...

Recent Comments