Home शहरं नागपूर नागपुर बातमी: बॅडमिंटन हॉलला नगरसेवकांनी ठोकले कुलूप - the badminton hall was...

नागपुर बातमी: बॅडमिंटन हॉलला नगरसेवकांनी ठोकले कुलूप – the badminton hall was locked by the corporators


म.टा.विशेष प्रतिनिधी,नागपूर,

मनपाने हनुमान नगर येथे तयार केलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये हनुमान नगर झोनचे कर संकलन कार्यालय हलविण्यात आले आहे. याला नगरसेवकांनी विरोध केला आणि मंगळवारी कर विभागाचे कर्मचारी आत असताना नगरसेवकांनी हॉलला कुलूप ठोकले. महापौर संदीप जोशी तेथे पोहचले. त्यांनी प्रशासनाच्या या कृतीबद्दल नाराजी व्यक्त करीत मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत हॉल रिकामा करण्याचे निर्देश दिले. तसे झाले नाही तर २ जुलैला नगरसेवकांसोबत आपणही हॉलसमोर उपोषणाला बसणार, असा अल्टीमेटम त्यांनी दिला.

नगरसेवक डॉ. रवींद्र (छोटू) भोयर, उषा पॅलट, शीतल कामडे यांच्यासह परिसरातील नागरिक हनुमाननगर बॅडमिंटन हॉल येथे पोहोचले. येथील कर संकलन कार्यालय चंदननगर येथील शाळेत होते. ही इमारत जीर्ण झाल्याने प्रशासानाने हे कार्यालय हनुमाननगरच्या बॅडमिंटन हॉलमध्ये हलविले. मात्र नगरसेवक आणि नागरिकांनी त्याला विरोध केला. हॉल गाठत मुख्य द्वाराला कुलूप लावले

अधिकाऱ्यांवर नाराजी

महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, आरोग्य समिती सभापती विरेंद्र कुकरेजा हॉलजवळ पोहोचले. त्यांनी प्रशासनाच्या या कृतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. हनुमाननगर झोनचे उपअभियंता हेडाऊ यांना हॉल रिकामा करण्यास सांगण्यात आले.

सहायक आयुक्तांना नोटीस

हॉलचा मुद्दा नागरिकांशी संबंधित आहे. नागरिकांनी त्यासंदर्भात तक्रार केली. नागरिकांची गर्दी झाली. त्यावर तोडगा काढण्यासाठी महापौर संदीप जोशी स्वत: तेथे पोहचणार होते. ही माहिती असतानाही हनुमाननगरच्या सहायक आयुक्त सुषमा मांडगे यांनी मुख्यालयात बैठकीचे कारण सांगून तेथे येण्यास असमर्थता दर्शविली. याची गंभीर दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे निर्देश दिलेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Uddhav Thackeray: सीरमच्या आगीमागे घातपात होता का याची चौकशी होणारः मुख्यमंत्री – an inquiry is being conducted into the cause of the fire; says...

पुणेः सीरम इन्स्टिट्यूटला लागलेल्या आगीबाबत चौकशी केली जात आहे. त्यानंतरच हा अपघात होता की घातपात हे स्पष्ट होईल, त्याआधी कोणताही निष्कर्ष काढणे योग्य...

narendra singh tomar: narendra singh tomar : ‘आंदोलनाचं पावित्र्यचं संपल्याने निर्णय कसा होईल’, कृषीमंत्री तोमर उद्विग्न – farmers welfare was not at the heart...

नवी दिल्ली: नवीन कृषी कायद्यांबाबत ( farm laws ) शेतकरी आणि सरकार यांच्यात ( farmers protest ) झालेली आजची बैठकही निष्फळ ठरली. आता...

Renu Sharma: धनंजय मुंडेंबाबत रेणू शर्मा यांचे निवेदन; ‘त्या’ व्हिडिओबाबतही दिले स्पष्टीकरण – no complaint against dhananjay munde statement issued by renu sharma

मुंबई:रेणू शर्मा या महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे गोत्यात आले होते. मुंडे यांच्यावर यावरून भाजप नेत्यांकडून सातत्याने निशाणा साधण्यात...

Ajinkya Rahane: अजिंक्यला सलाम… ऑस्ट्रेलियाकडून शिविगाळ ऐकल्यानंतरही एका कृतीने जिंकली सर्वांची मनं – hats off to indian captain ajinkya rahane, refuse to cut kangaroo...

मुंबई : अजिंक्य रहाणे ऑस्ट्रेलियामध्ये नेतृत्व करत असताना त्याला प्रेक्षकांकडून शिविगाळ ऐकावी लागली. पण ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांकडून शिविगाळ ऐकली असली तरी त्यांचा सन्मान अजिंक्यने...

Recent Comments