Home शहरं नागपूर नागपुर बातमी: रेल्वे स्थानकावर चोरटे कसे शिरतात? - how do thieves break...

नागपुर बातमी: रेल्वे स्थानकावर चोरटे कसे शिरतात? – how do thieves break into a railway station


म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर

एकीकडे प्रवाशांना कन्फर्म तिकीट असल्याशिवाय आणि सर्व अटी पूर्ण केल्याशिवाय रेल्वे स्थानकावर प्रवेश मिळत नाही. मात्र, त्याचवेळी चोरटे रेल्वेगाडी तसेच प्लॅटफॉर्मवर ‘हात की सफाई’ दाखवीत असल्याने ते रेल्वे स्थानकावर प्रवेश कसा मिळवतात, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

सध्या लॉकडाउन अंशत: उठले आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांनी राज्यातल्या राज्यात जाता येत नाही. पण, दुसऱ्या राज्यात जाता येते. गावाला जाताना डॉक्टरांचे प्रमाणपत्र, कन्फर्म तिकीट, आरोग्य सेतू अॅप असे सारे उपचार करावे लागतात. चोरटे या सर्व अटींची पूर्तता करून रेल्वे स्थानकावर प्रवेश मिळवितात की, खुष्कीच्या मार्गाने आता शिरतात, याचा शोध घेण्याची जबाबदारी आता सुरक्षा यंत्रणांची आहे. कारण, रेल्वे गाडी व प्लॅटफॉर्मवर अलीकडेच घडलेल्या दोन घटनांनी गाड्यांमध्ये चोरटे सक्रिय झाल्याचे दिसत आहे. धावत्या गाडीत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून चोरट्याने उडी मारून पळ काढल्याची घटना नुकतीच जयपूर एक्स्प्रेसमध्ये घडली.

पहिली घटना २६ जूनच्या रात्री १०.१५ वाजता घडली. १२९६७ चेन्नई-जयपूर एक्स्प्रेस नागपूर रेल्वे स्थानकावर आली. याच गाडीत चेन्नई येथील किशोर शर्मा (वय ३२) हे प्रवास करीत होते. गाडी नागपूर स्थानकावरून सुटताच एका चोरट्याने धावत्या गाडीत शर्मा यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीची सोनसाखळी ओढली व धावत्या गाडीत खाली उडी घेऊन तो पळून गेला.

दरम्यान, गाडीनेही वेग घेतल्याने शर्मा ओरडण्यापलीकडे काही करू शकले नाहीत. गाडी जयपूरला पोहोचल्यावर त्यांनी जयपूर लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दिली. मात्र, प्रकरण नागपूर हद्दीत घडल्याने हे प्रकरण नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे पाठविण्यात आले. आता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दुसरी घटना, १२८४३ पुरी अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये घडली. वडोदरा निवासी सुरेशभाई चंदाराणा (७२) हे दुर्ग ते वडोदरा प्रवास करीत होते. एस ९ बोगीत असताना सकाळी ५.३० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी थांबली. चंदाराणा हे पाण्याची बाटली भरण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरले. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या पॅण्टच्या खिशातील १७ हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. त्यांनी वडोदरा पोलिसांकडे तक्रार केली. वडोदरा पोलिसांनी हे प्रकरण नागपूर लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Shiv Sena on Narendra Modi: मोदी अध्यात्माच्या मार्गाने निघालेले दिसतात; ‘त्या’ भाषणामुळं शिवसेनेला शंका – shivsena taunts governor koshyari over pm narendra modi speech

मुंबई: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरामोहरा अलीकडच्या काळात बदलला आहे. दाढी वाढली आहे. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळे तेज दिसत आहे. एक तर ते अध्यात्माच्या...

'रिपब्लिक टीव्ही'विरुद्ध हंसा ग्रुपचा नवा दावा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'टीआरपी घोटाळा प्रकरणात ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलच्या () दक्षता पथकासोबत काम करून आम्ही अंतर्गत अहवाल तयार करून त्याआधारे मुंबई...

Recent Comments