Home संपादकीय नामदेव शास्त्री: ओळखणे - olakhne

नामदेव शास्त्री: ओळखणे – olakhne


न्यायाचार्य डॉ. नामदेव शास्त्री

भाव जाणून दोष देणारा हा निर्दोष मानला जातो. भाव ओळखण्यासाठी योग्यता हवी. योग्यता योग्य प्रयत्नाने येते. या जगात प्रयत्न तर सर्व करतात, दिशा मात्र प्रत्येकाची योग्यच असते, असे नाही. मराठी माणसांना मराठी येते; परंतु कलात्मक मराठी ही काही वेगळी असते. शिवाय भाषेतील कलात्मकता सर्वांनाच कळते असेही नाही. आपल्या कल्पना कलात्मक पद्धतीने जो अभिव्यक्त करतो, तो कवी असतो. त्याचा भाव हा अभावानेच कळतो. कलात्मक मराठी समजण्यासाठी जाण लागते. काव्यातील शब्दांचे नियोजन समजणे महत्त्वाचे असते. हिरा जसा जाणकारांनाच समजतो, तसे अनमोल शब्द ओळखण्याची जाण प्रत्येकात नसते. न ओळखणे ही मनुष्याची अयोग्यता असते. कोणत्याही मोठ्या माणसाला मानणे आणि तो समजणे, यात खूप अंतर आहे. मोठेपण समजता समजता सामान्य मोठा होत असतो. याला शिष्याचे गुरुत्वाला जाणे म्हणतात. उणीवा नसताना दोष देणारा निंदक असतो. त्याचे वर्षश्राद्ध होत नसते, तर पुण्यतिथी काय साजरी होणार!

ओळखता येणे, हाच मोठे होण्याचा राजमार्ग आहे. ओळखल्यावरच आपण स्वतःला धोक्यातून वाचवू शकतो. सीतेने योग्य वेळी जर रावणाला ओळखले असते, तर अपहरण झाले नसते. न ओळखल्यामुळे आपल्या अपहरणाला आपण जबाबदार असतो. आजपर्यंत लक्ष्मणाला कोणीही दोष देत नाही; कारण तो योग्य सांगत होता. रामाच्या जवळ चौदा वर्षे असणाऱ्या राजघराण्यातील सीता जर लक्ष्मणाला ओळखू शकत नाही, तर सामान्यांकडून संतांनी काय अपेक्षा करावी? संतदेखील अपेक्षा करत नसतात; परंतु एखाद्या समजदाराला योग्य मार्ग दाखवावा, एवढीच त्यांना अपेक्षा असते. किमान समजदार तरी जीवनात भटकू नयेत.

मराठी बोलणारा महाराष्ट्र आहे, त्यात मराठी वाचणारा वर्ग किती? त्या वाचणाऱ्यांत कविता वाचणारा आणि समजणारा किती? अर्थ समजणाऱ्याला भाव समजेलच असे नाही. भाव ओळखणारा मोठा असतो. तो निंदक नसतो. उणीवा काढत नसतो. सार ग्रहण करण्याची वृत्ती असल्यामुळे तो आनंदी असतो. आनंद हे मनुष्य जीवनातील सार आहे. त्याला ग्रहण करण्यासाठी ‘भाव’ ओळखण्याची योग्यता लागते. ज्ञानेश्वरी भाव+अर्थ दीपिका आहे. दिव्याचा उपयोग फक्त डोळसच करत असतात. दृष्टीवान असणे हीच योग्यता आहे. ज्ञानेश्वरी योग्य दृष्टिकोन देते. ओळखण्यासाठी तिचा उपयोग होतो. दृष्टी ही हवीच असते. दृष्टी ही विचारवंत आणि अनुभवी संत देत असतात, त्यांना ओळखण्याची आपली योग्यता हवी.

(न्यायाचार्य डॉ. नामदेवशास्त्री महाराज हे एम. ए. पीएच.डी. असून त्यांचा मराठी व संस्कृतचा व्यासंग आहे. वाराणसी विद्यापीठाची न्यायाचार्य ही पदवी त्यांनी संपादन केली आहे. ते श्रीक्षेत्र भगवान गडाचे महंतही आहेत.)Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest: farmers protest : शेतकरी आणि सरकारमध्ये आता बुधवारी बैठक; कृषीमंत्री बोलले… – farmers protest farm laws agriculture minister narendra singh tomar

नवी दिल्लीः आंदोलनकारी शेतकरी संघटनांसह ( farmers protest ) सरकारची चर्चेची दहावी फेरी आता बुधवारी २० जानेवारीला होणार आहे. यापूर्वी ही चर्चा १९...

Shane Warne As He Remains Unimpressed With Tim Paine’s Tactics – IND vs AUS : भारतीय संघच बेस्ट, शेन वॉर्नने दिला ऑस्ट्रेलियाच्या संघाला घरचा...

ब्रिस्बेन, IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा माजी महान क्रिकेटपटू शेन वॉर्नने यावेळी आपल्याच संघाला घरचा अहेर दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघावर जोरदार टीका करत...

Recent Comments