Home ताज्या बातम्या नालासोपाऱ्यात टेम्पोत सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ The body of an...

नालासोपाऱ्यात टेम्पोत सापडला अज्ञात महिलेचा मृतदेह, परिसरात खळबळ The body of an unidentified woman was found in a tempo in Nalasopara | Crime


एका टेम्पोमध्ये गोणीमधून वास येत असल्याने टेम्पो चालकाने टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर यांना फोन करून बोलावलं.

नालासोपारा, 28 जून : नालासोपारा पूर्वेकडील चंदन नाका येथे एका टेम्पोमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह सापडला असून एकच खळबळ माजली आहे. सायंकाळच्या सुमारास चंदन नाका येथे एका टेम्पोमध्ये गोणीमधून वास येत असल्याने टेम्पो चालकाने टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर यांना फोन करून बोलावलं.

टेम्पो स्टॅन्ड अध्यक्ष श्रीधर पाटेकर हे तिथं आल्यानंतर टेम्पोतील गोणीत मृतदेह असल्याचा संशय आल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केले. त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी ती गोणी उघडी करून पाहिलं तर समोर एका महिलेचा मृतदेह होता. हे पाहून तिथं उपस्थित असलेले सर्वजणच हादरून गेले.

टेम्पोत मृतदेह नेमका कुठून आला आणि मृत महिला नेमकी कोण आहे? याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले आहे. मात्र त्या महिलेची ओळख अजून पटू शकली नाही. नेमका हा खून कोणी केला व का केला याचा पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान, नालासोपारा पूर्वेत नुकताच एक गुन्हा घडला होता. डॉन लेन परिसरात शनिवारी रात्री एका इसमाने आपल्या तीन लहान कोवळ्या मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी मयत कैलास परमार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डॉन लेन परिसरातील बाबूल पाडा इथे कैलास परमार रहात होता. शनिवारी रात्रीच्या 7 ते 8 च्या सुमारास त्याने नंदीनी परमार (8), नयना परमार (3) आणि नयन परमार (12) या तीन मुलांची चाकूने गळा चिरून निर्घुणपाने हत्या केली आणि नंतर स्वत:वर देखील चाकूने वार करून आत्महत्या केली.

First Published: Jun 28, 2020 10:41 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

vaccine production site: Coronavaccine: …तोपर्यंत लसीविषयीचे दावे विश्वासार्ह मानता येणार नाहीत! – now essential to maintain cold chain from the vaccine production site to...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनास प्रतिबंध करणाऱ्या लसीच्या उपयुक्तता आणि क्षमतेविषयी सातत्याने दावे केले जात आहेत. मात्र तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्याखेरीज...

Recent Comments