Home शहरं नाशिक नाशिक लॅब: नाशिकला अखेर मिळालं कायमस्वरूपी लॅब - nashik finally has a...

नाशिक लॅब: नाशिकला अखेर मिळालं कायमस्वरूपी लॅब – nashik finally has a permanent lab


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

करोना संकटाचे अनेक नकारात्मक परिणाम आपल्या सभोवती दिसत असले, तरी याच संकटामुळे नाशिककरांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टीही घडत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अद्ययावत लॅबची मागणी पूर्ण होत असून, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पार्टिशनचे कामही सुरू होत आहे. पुढील तीन-चार दिवसांत तपासणीसाठीची मशिनरी प्राप्त होणार असून, आठवडाभरात लॅब सुरू होईल, अशी माहिती हॉस्पिटल प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग पसरत चालला आहे. त्यामुळे दिवसागणिक येथील रुग्णांची संख्याही वाढतच आहे. संशयित रुग्णांची संख्यादेखील वाढू लागल्याने त्यांचे स्वॅब घेण्याचे काम आरोग्य यंत्रणेकडून युद्धपातळीवर सुरू आहे. संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच पुणे आणि धुळे येथील लॅबमध्ये स्वॅब तपासण्यासाठी पाठविले जात आहेत.

परंतु, आता सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतीमध्येच अद्ययावत लॅब सुरू करण्यास जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मान्यता दिली आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी त्याकरिता एक कोटी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये होऊ पाहणारी लॅब आता खऱ्या अर्थाने दृष्टिपथात आली आहे. हॉस्पिटलच्या इमारतीमध्ये बाह्य रुग्ण तपासणी कक्षाच्या मागे जेथे तपासणी प्रयोगशाळा आहे त्याच्या समोरच्याच बाजूला या लॅबसाठीची जागा निश्चित करण्यात आली आहे.

‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून आज, सोमवार (दि. २९)पासून येथे पार्टिशनच्या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सिव्हिल हॉस्पिटलचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे यांनी दिली. पार्टिशनचे काम चार दिवसांत संपेल. बेंगळूरू येथील कंपनीकडे लॅबसाठीच्या आवश्यक मशिनरीची मागणी नोंदविली असून, पुढील चार-पाच दिवसांत ही मशिनरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहोचेल. ही मशिनरी लॅबमध्ये सेट केल्यानंतर ‘आयसीएमआर’च्या मार्गदर्शक सूचनांनुसार या लॅबमध्ये प्रशिक्षित टेक्निशियन्सद्वारे स्वॅबचे नमुने तपासले जाणार आहेत. ही तपासणी यशस्वी झाली, की लगेचच या लॅबमध्ये स्वॅब तपासणीचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे डॉ. सैंदाणे यांनी सांगितले.

भविष्यातही तातडीक निदान शक्य

या लॅबसाठी सध्या सिव्हिल हॉस्पिटलमधील कुशल मनुष्यबळाची मदत घेतली जाणार आहे. पॅथॉलॉजिस्ट आणि टेक्निशियनकडे या लॅबचे नियंत्रण असेल. करोना काळात स्वॅब तपासण्याकामी या लॅबची मदत होईलच, परंतु त्याचबरोबर भविष्यात कोणत्याही व्हायरल आजारांतदेखील ही लॅब कायमस्वरूपी उपयुक्त ठरणार आहे. या लॅबमध्ये मनुष्यबळाबरोबरच कॉम्प्युटर, प्रिंटर, स्कॅनर, टेस्टिंगसाठीची अन्य सामग्री पुढील आठवडाभरात उपलब्ध होणार असून, लगेचच लॅब कार्यान्वित होणार आहे.

सध्या आडगावसह पुणे आणि धुळ्यातही सध्या स्वॅब पाठविले जात आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील आठवड्यात लॅब सुरू होईल. तीन शिफ्टमध्ये येथे काम चालेल. दररोज ३०० स्वॅब तपासता येतील. त्यांचे अहवाल लवकर मिळू शकतील. हॉस्पिटलमध्येच लॅब असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणेही शक्य होईल. भविष्यात विविध आजारांच्या निदानासाठी ही कायमस्वरूपी लॅब उपयुक्त ठरणार आहे.

-डॉ. निखिल सैंदाणे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

illegal sand mining: Illegal Sand Mining: वाळू माफियांच्या टोळीत भाजप नगरसेवक; पोलिसांवर डंपर घालण्याचा प्रयत्न – illegal sand mining case filed against 12 including...

जळगाव: धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील गिरणा नदी पात्रात धरणगाव पोलिसांनी पहाटे अडीच ते साडेपाचच्या दरम्यान सापळा रचून वाळू माफियांच्या टोळीवर धडक कारवाई केली...

Manohar Lal Khattar: ‘शेतकऱ्यांना MSP बाबत कुठलीही अडचण आली, तर राजकारण सोडून देईन’ – manohar lal khattar targets punjab cm captain amarinder singh on...

नवी दिल्लीः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात ( farm laws) शेतकऱ्यांनी मोर्चा ( farmers protest ) उघडला आहे. आता त्यावरून राजकार रंगलं आहे. पंजाबचे...

ms dhoni: महेंद्रसिंग धोनीने पार्टीमध्ये केला भन्नाट डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल… – indian former captain ms dhoni dance in a party, chennai super kings’...

नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनीला आपण सर्वच कॅप्टन कूल म्हणून ओळखतो. त्यामुळे धोनीला आतापर्यंत कोणत्याही पार्टीमध्ये तुम्ही नाचताना पाहिले नसेल. पण धोनीचा एक...

Recent Comments