Home शहरं नाशिक ‘निमा’ निवडणुकीचा बिगुल

‘निमा’ निवडणुकीचा बिगुलम. टा. प्रतिनिधी,

निवडणुकीवरून विश्वस्त आणि सत्ताधारी कार्यकारिणीत आरोप-प्रत्यारोपांची राळ उठलेली असतानाच नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या () द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम शुक्रवारी रात्री उशिरा निवडणूक समितीने जाहीर केला आहे. पदाधिकाऱ्यांसह कार्यकारिणीच्या ४१ जागांसाठी दि. २९ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी. जी. जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘निमा’च्या कार्यकारिणीची मुदत ३१ जुलै रोजी संपत असल्याने निवडणूक घ्यावी, अशी विश्वस्त मंडळाची इच्छा होती, तर कोविडमुळे सरकारने निवडणुका पुढे ढकलल्या असून, सरकारी आदेश येईपर्यंत निवडणूक घेऊ नये, अशी सत्ताधाऱ्यांची इच्छा होती. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी निवडणूक समितीने बैठक घेत निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ‘निमा’चे माजी अध्यक्ष डी. जी. जोशी, तर त्यांना सहाय्यक म्हणून माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर, राजेंद्र छाजेड, आयमाचे माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवाद म्हणून महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांची नेमणूक विश्वस्त मंडळाने केली आहे.

१ जुलैपासून अर्जविक्री

सुमारे ३५०० सभासद असलेल्या या संस्थेच्या ४१ जागांसाठी दि. १ जुलैपासून उमेदवारी अर्ज विक्री सुरू करण्यात येणार आहे. १४ जुलै अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. दि. २१ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येणार आहेत. निवडणूक बिनविरोध न झाल्यास दि. २९ जुलै रोजी मतदान घेण्यात येणार असून दि. ३० जुलै रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. निमाच्या घटनेनुसार पहिल्या वर्षी मोठ्या उद्योग घटकासाठी अध्यक्षपद राखीव आहे, तर सरचिटणीस, खजिनदार, प्रत्येकी एक पद, उपाध्यक्ष दोन पदे, त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकासाठी सचिवाची दोन पदे असून, त्यात लघु आणि मोठ्या उद्योग घटकांसाठी आणि सिन्नर, दिंडोरी यांसह कार्यकारिणीच्या ३४ अशा ४१ पदांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार आहे.

…तर विश्वस्त, निवड समिती जबाबदार

विश्वस्त मंडळाने पदाचा गैरवापर करीत स्टाफवर दबाव आणून एका सदस्याच्या माध्यमातून सभासदांची यादी मागवली. तिचा वापर निवडणुकीच्या कामासाठी करणार नाही, असं त्यांच्याकडून लेखी घेऊनही निवड समितीने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मुळात निवडणूक समितीच बेकायदेशीर असतानाही त्यांनी निवडणूक जाहीर केली आहे. करोनाच्या साथीच्या पार्श्वभमीवर निवडणुका घ्यायच्या नाही, असा सरकारी आदेश असतानाही घाई गडबडीत निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप संस्थेचे मानद सचिव तुषार चव्हाण यांनी केला. भविष्यातील कारवाईस संस्थेची कार्यकारिणी नव्हे तर निवडणूक जाहीर करणारे जबाबदार असतील, असेही चव्हाण म्हणाले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ramchandra Guha Criticize N. Srinivasan And Sourav Ganguli’s Role In Indian Cricket – अमित शहा यांच्याबरोबर कोण चालवंतय बीसीसीआय, रामचंद्र गुहा यांनी केला गंभीर...

मुंबई : राजकारण आणि क्रिकेट यांचा संबंध फार वर्षांपासून येत आला आहे. पण सध्याच्या घडीला भारताचे गृह मंत्री अमित शहा हे बीसीसीआय चालवत...

Katrina Kaif Covid-19 Test Before Shoot Watch Video – कतरिना कैफने शेअर केली तिची करोना टेस्ट, लवकर सुरू करणार शूटिंग

मुंबई- करोना व्हायरसचा वाढा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुरुवातीच्या काळात जगभरात लॉकडाउन करण्यात आलं. सिनेसृष्टीतही यातून सुटली नाही. अनेक निर्बंधासह शूटिंगचं काम तातडीने बंद...

Recent Comments