Home ताज्या बातम्या निर्बंध कायम! पुण्यात अजूनही सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही lockdown3 no petrol diesel...

निर्बंध कायम! पुण्यात अजूनही सर्वसामान्यांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही lockdown3 no petrol diesel for pune only except essential goods carriers | Pune


सोमवारपासून देशभरात Lockdown3 चे बदललेले नियम लागू झाले असले, तरी पुण्यात अद्याप परिस्थिती जैसे थे आहे. शहरात पेट्रोल-डिझेल पुरवठा सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही.

पुणे, 4 एप्रिल : सोमवारपासून देशभरात Lockdown3 चे बदललेले नियम लागू झाले असले, तरी पुण्यात अद्याप परिस्थिती जैसे थे आहे. शहरात पेट्रोल-डिझेल पुरवठा सर्वसामान्यांसाठी खुला करण्याचा मार्ग अद्याप मोकळा झालेला नाही. सर्वसामान्यांना उद्याही पेट्रोल डिझेल मिळणार नाही. फक्त जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठीच इंधन पुरवले जाईल, असा निर्णय पेट्रोल पुरवठादारांच्या संघटनेनं घेतला आहे.

पेट्रोल डीलर असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने तिसरा लॉकडाऊन सुरू व्हायच्या आधी दिलेल्या सूचनांनुसार पेट्रोल -डिझेलबाबत नवीन सुधारित आदेश काय याबाबत संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं. पण सुधारित आदेश आज आलेले नाहीत. त्यामुळे उद्याही पुणेकरांना दुचाकी किंवा चारचाकीसाठी पेट्रोल मिळणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा जे पुरवठा करत आहेत किंवा सुविधा देत आहेत त्यांच्याच वाहनांना पेट्रोल-डिझेल देण्यात येईल. सामान्य लोकांनी पंपांवर विनाकारण गर्दी करून वाद घालू नयेत, अशी सूचना पेट्रोल पंपचालकांनी दिली आहे.

वाचा – पुणे पोलिसांनी दारू विक्रीसाठी घेतला मोठा निर्णय, उद्यापासून नियम लागू

पुण्यात आज  दिवसभरात 61 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आणि 6 करोनाबाधितांचा मृत्यू झाला.  एकीकडे कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने सोमवारपासून लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात बदलले आहेत. त्यानुसार पुण्यात आता निरीक्षणात आलेल्या  69  Micro containment Zones मध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत. तर उर्वरित ठिकाणी पुणेकरांना थोडा मोकळा श्वास घ्यायला परवानगी देण्यात येणार आहे.

69 कंटेन्मेंट झोन कुठले?

मध्यवर्ती पुण्यातल्या सर्व पेठा (नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ वगळून), पर्वती दर्शन नीलायम, दांडेकर पूल, तळजाई वस्ती, शिवदर्शन, दांडेकर पूल, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, काकडे वस्ती, मीठानगर, कोंढवा, कात्रज, सुखसागरनगर, बालाजीनगर, धनकवडी- गुलाबनगर, अप्पर इंदिरानगर, प्रेमनगर, कामगार पुतळा, पाटील इस्टेट, शिवाजीनगर -म. गांधी झोपडपट्टी, येरवडा ताडीगुत्ता, जयप्रकाशनगर, गांधीनग ,नागपूर चाळ, फुलेनगर- येरवडा, धानोरी-कळस, वैदूवाडी, गोसावीवस्ती, सय्यदनगर, गुलामअलीनगर, सातववाडी, माळवाडी, हांडेवाडी, वेताळनगर, हडपसर- आदर्श कॉलनी, मीनाताई ठाकरे नगर, कोथरूड – शिवतारा सोसायटी, चंद्रगुप्त सोसायटी, ताडीवाला रस्ता, वडगाव शेरी, गणेशनगर, गुलटेकडी, डायस प्लॉट.

अन्य बातम्या

प्रिय व्यक्ती कायमची सोडून गेल्यानंतर स्वत:ला कसं सांभाळाल?

Fact Check: सरकार बेरोजगारांना प्रत्येक महिन्यात देणार 3500 रुपये? खरं की खोटं

परदेशात अडकलेले भारतीय लवकरच पोहोचणार मायदेशी, केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर

 

First Published: May 4, 2020 10:53 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

shiv sena vs bjp in bmc: शिवसेनेवरचा ‘हा’ आरोप भाजपला भलताच महागात पडला! – maha vikas aghadi parties hit the bjp over distribution of...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईगेल्या वर्षीच्या विकासनिधीचा शिवसेनेकडून गैरवापर झाल्याचा आरोप भाजपलाच महागात पडला आहे. यंदाच्या विकासनिधी वाटपात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि...

maharashtra budget 2021: राज्यात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार? अर्थसंकल्पात मोठ्या घोषणेची शक्यता – maha vikas aghadi government trying to give concession in petrol and...

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईपेट्रोल व डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांत प्रचंड वाढ झाली असल्याने यातून राज्यातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकार...

THE NEW JIOPHONE 2021 OFFER: Reliance Jio चा नवा धमाका, ७४९ रुपयांत वर्षभर अनलिमिटेड कॉल आणि डेटा – jiophone 2021 offer announced with 2...

हायलाइट्स:रिलायन्स जिओची जबरदस्त ऑफर १ मार्च २०२१ पासून या ऑफरला सुरुवात होणार THE NEW JIOPHONE 2021 OFFER असे नाव नवीन आणि जुन्या ग्राहकांना...

Recent Comments