Home शहरं औरंगाबाद निवारागृहातून पळालेले सिल्लोडमध्ये सापडले

निवारागृहातून पळालेले सिल्लोडमध्ये सापडलेम. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

‘लॉकडाऊन’चा कालावधी वाढू लागल्यामुळे निवारागृहात ठेवण्यात आलेल्या विस्थापितांपैकी पलायन केलेल्या सहा जणांना पोलिसांनी सिल्लोड येथून पकडून आणण्यात आले आहे. हे विस्थापित सिडको एन-सातमधील शाळेतून पळून गेले होते.

परराज्यातील किंवा पर जिल्ह्यांतील कामगार आपापल्या गावाला जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याना प्रशासनाने महापालिकेच्या निवारागृहात ठेवले आहे. सिडको एन सात, सिडको एन सहा, जवाहर कॉलनी आणि भडकलगेट या चार ठिकाणी त्यांची व्यवस्था केली आहे. या शाळांमधून ठेवण्यात आलेल्या विस्थापितांची संख्या १६१ आहे. निवारागृहात राहून त्यांना आता २७ दिवस पूर्ण झाले आहेत. हाताला काम नाही आणि त्यातच घरची चिंता सतावत असल्यामुळे विस्थापितांमध्ये चलबिचल निर्माण झाली. ‘आम्हाला घरी जाऊ द्या,’ एवढीच मागणी ते अधिकाऱ्यांकडे करीत आहेत, परंतु ‘तीन मेपर्यंत ‘लॉकडाऊन’ असल्यामुळे तुम्हाला सोडता येणार नाही. ‘लॉकडाऊन’ संपल्यावर शासनाच्या आदेशाने तुम्हाला तुमच्या गावाला पाठवण्यात येईल,’ असे सांगून अधिकारी त्यांची समजूत काढत आहेत.

‘लॉकडाऊन’ संपेपर्यंत आपली सुटका नाही हे लक्षात आल्यामुळे आता पळून जाण्याचा मार्ग विस्थापितांनी स्वीकारला आहे. सिडको एन सात येथील शाळेतून सहा जण शनिवारी (२५ एप्रिल) पळून गेले. त्याची माहिती मिळाल्यावर पोलिस त्यांच्या मागावर गेले. पोलिसांनी त्यांना जणांना सिल्लोडमध्ये गाठले आणि तेथून त्यांना पुन्हा सिडको एन सात येथील शाळेत आणून सोडले.

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त विजया घाडगे यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की, ते सहा जण मध्य प्रदेशातील आहेत. ते सिल्लोडपर्यंत पायी गेले होते. पोलिसांनी रविवारी दुपारी तीन वाजता त्यांना पुन्हा सिडको एन सात येथील शाळेत आणून सोडले. शाळेत आल्यानंतर त्यांना जेवण देण्यात आले. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

farmers protest on burari nirankari ground: अखेर शेतकऱ्यांना दिल्लीत एन्ट्री, बुराडी मैदानात आंदोलनाची परवानगी – farmer protest delhi burari nirankari ground police permission farm...

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातून दाखल झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना अखेर दिल्लीत एन्ट्री मिळालीय. शुक्रवारी पोलीस आणि आंदोलकांत उडालेल्या धुमश्चक्रीनंतर प्रशासनाकडून शेतकऱ्यांना...

mumbai news News : NCP: राष्ट्रवादीने आघाडीधर्म पाळला; शिवसेनेच्या विरोधातील ‘त्या’ बंडखोराची हकालपट्टी – candidate who rebelled against shiv sena expelled from ncp

मुंबई: अमरावती शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात आला आहे. या उमेदवाराविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरणाऱ्या चंद्रशेखर ऊर्फ शेखर भोयर...

‘डेथ ऑडिट’कडे महापालिकेचे दुर्लक्ष

म. टा. प्रतिनिधी, करोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण औरंगाबाद शहरात कमी होताना दिसत नाही. तीन ते साडेतीन टक्क्यांवर कायमच आहे. त्यामुळे...

Recent Comments