Home संपादकीय निष्ठावंतांना पुन्हा हूल

निष्ठावंतांना पुन्हा हूल


विधान परिषदेच्या उमेदवारीच्या निमित्ताने नेतृत्वाने पुन्हा एकदा निष्ठावंतांना दूर ठेवले आहे. मात्र, उद्या राज्यात सत्ता आली नाही, तर इतर पक्षांतून आलेले काय करतील, हा प्रश्नच आहे. पक्षाला उभारी आणायची असेल, तर निष्ठावंतांना सोबत घ्यावेच लागेल…

– नरेश कदम

राज्यात सत्ता स्थापन करण्यामागे प्रदेश भाजपमधील गटातटांचे राजकारण कारणीभूत आहे. परस्परांचे काटे काढण्याच्या नादात सत्ता गमावावी लागली, तरी यातून भाजपचे नेतृत्व काही शिकलेले दिसत नाही. विधान परिषदेच्या नऊ जागांच्या निवडणुकीत उमेदवारांची निवड करताना भाजपमधील जुन्या आणि निष्ठावंतांचे पत्ते कट केले गेले. भाजपचे ज्येष्ठ नेते , पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे या चार नेत्यांपैकी एकालाही विधान परिषदेचे तिकीट दिले नाही. या ज्येष्ठ नेत्यांना संधी न देता नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि अजित गोपछडे या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना तिकीट दिले गेले; परंतु उमेदवारी अर्ज भरल्यावर अजित गोपछडे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली, तर डमी उमेदवार म्हणून ज्या रमेश कराड यांनी अर्ज भरला होता, त्यांना अधिकृत उमेदवार करण्यात आले. गोपछडे यांच्या नावाची शिफारस संघाच्या भाजपच्या संघटन महामंत्र्यांनी केली होती; परंतु गोपछडेंबाबत पक्षाच्या यंत्रणेने पुन्हा चौकशी केल्यानंतर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. यात पुन्हा राजकारण झाले. कराड यांचा डमी उमेदवारी अर्ज भरला होता. पंकजा मुंडे यांची विधान परिषदेची उमेदवारी निश्चित मानली जात होती. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी भगवानगडावर वंजारी समाजाची मोठी रॅली आयोजिली. तेव्हा त्यांनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती. परिणामी, केंद्रीय नेतृत्वाचे त्यांच्या विरोधात कान भरण्यात आले. यामुळे पंकजा मुंडे यांची तिकीट कापले गेले. गोपीनाथ मुंडे यांनी वंजारी समाज भाजपच्या झेंड्याखाली आणला. हा समाज भाजपला हवा आहे. मात्र, मुंडे घराण्याचे नेतृत्व नको आहे. त्यामुळे रमेश कराड यांचे तिकीट अधिकृत करण्यात आले. कराड हे वंजारी समाजाचे आहेत. त्यातून पंकजा यांना शह देण्याची खेळी खेळली गेली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना ते पद देण्यात आले, तेव्हा ते तात्पुरते त्यांच्याकडे राहील आणि पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडून आल्यावर ते त्यांच्याकडे जाईल, असे बोलले गेले; परंतु त्यांना आता तिकीटच मिळाले नाही. पंकजा मुंडे यांच्यापुढे आता बंड करून वंजारी, धनगर आणि बंजारा अशी व्होटबँक पुन्हा बांधण्याचा पर्याय शिल्लक आहे.

दुसरीकडे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही विधान परिषदेची उमेदवारी मागितली होती; परंतु त्यांनाही ती नाकारण्यात आली. त्यांनी आपली खदखद पुन्हा बोलून दाखवली. दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना तिकीट दिली जाते; परंतु त्यांचा पक्षाला किती फायदा होईल, याचे मूल्यमापन केले जात नाही. रणजितसिंह मोहिते पाटील हे मराठा समाजाचे असले, तरी त्यांना तिकीट देऊन मराठा समाज भाजपकडे येईल, अशी स्थिती नाही. रमेश कराड यांना उमेदवारी देऊन वंजारी समाज भाजपसोबत जोडला जाणार नाही. पक्षाच्या मुशीत तयार झालेल्या समाजाच्या नेत्यांना डावलून केवळ दुसऱ्या पक्षातील नेत्यांना आणल्याने राजकीय फायदा होणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट विधानसभेच्या निवडणुकीत कापण्यात आले. ते तेली समाजाचे आहेत. विदर्भातील अनेक जागांवर या समाजाचे वर्चस्व आहे. बावनकुळेंचे तिकीट कापल्यामुळे भाजपच्या अनेक जागा गेल्या; पण आता त्यांना तिकीट दिले असते, तर विधानसभेला त्यांचे तिकीट का कापले, याचे उत्तर पक्षाच्या नेतृत्वाला द्यावे लागले असते, म्हणून त्यांना तिकीट दिले नाही, असे म्हणतात. पक्षाचे मराठा समाजाचे नेते विनोद तावडे यांचे विधानसभेचे तिकीट कापण्यात आले होते. त्यांनी या वेळी पक्षाकडे विधान परिषदेचे तिकीट मागितले नाही. सबुरीची भूमिका घेतली.

प्रदेश भाजपची खरी सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत, हेच विधान परिषदेच्या चार जागांवरील उमेदवार निवडीने स्पष्ट झाले. जरी सत्तेने त्यांना हुलकावणी दिली असली, तरी अजून केंद्रीय नेतृत्व त्यांचेच ऐकते; परंतु राज्यात भविष्यात भाजपला पुन्हा उभारी आणायची असेल, तर जुन्या आणि निष्ठावंत गटांना सोबत घेऊन जावे लागेल; कारण अन्य पक्षांतून आलेले नेते हे केंद्रातील सत्ता गेल्यानंतर पळून जातील. राज्यातही आणखी सहा महिने भाजपची सत्ता येते का, याची वाट बघतील. अन्यथा, तेही पुन्हा स्वगृही परततील.

naresh.kadam@timesgroup.comSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

young woman murder in mhasrul nashik: म्हसरूळ शिवारात महिलेचा खून – 23 years old young woman murdered by unknown person in nashik

म. टा. वृत्तसेवा, पंचवटीम्हसरूळ शिवारातील पेठरोड परिसरातील पवार मळ्यानजिकच्या नाल्याजवळ महिलेचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि. १९) रात्री...

cold storage project in aurangabad: ‘कोल्ड स्टोअरेज’ला मुहूर्त मिळेना – work on the aurangabad cold storage proposal has not started even after 8 months

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादजाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील प्रस्तावित 'कोल्ड स्टोअरेज'च्या कामास आठ महिन्यांनंतरही मुहूर्त लागला नाही. संबंधित कंपनीने 'लिज प्रीमियम'पोटी...

second side of farm loan waiver: कर्जमाफीची दुखरी बाजू – devidas tuljapurkar article on second side of farm loan waiver

देविदास तुळजापूरकरकृषी कायद्याच्या विरोधातील आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटत असताना, याच घटकांशी संबंधित; परंतु सर्वस्वी वेगळ्या आणि सर्वार्थाने देशव्यापी अशा एका प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा...

Recent Comments