Home शहरं नाशिक ‘निसर्गचक्र’ फिरले; वादळाचा तडाखा

‘निसर्गचक्र’ फिरले; वादळाचा तडाखा


– शहरात ताशी ३५ किमी वेगाने वारे

– सायंकाळपर्यंत २३.२ मिमी पाऊस

– आस्थापने बंद, दुपारनंतर कार्यालयांना सुटी

– बारा झाडे कोसळली

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुंबई किनारपट्टीहून उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने निघालेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने ऐनवेळी दिशा बदलल्याने प्रभावहीन झाले असले तरी वादळी वाऱ्याचा फटका शहराला बसला आहे. शहरात सायंकाळी साडेपाचपर्यंत २३.२ पेक्षा जास्त मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी रात्री साडेअकरापासून सुरू झालेल्या संततधारेचे बुधवारी दुपारनंतर मुसळधार पावसात रूपांतर झाले. त्या वेळी शहरात ताशी ३५ किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. यामुळे शहरातील बारापेक्षा जास्त वृक्ष उन्मळून पडले. दारे, खिडक्या एकमेकांवर आदळल्या. सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मुसळधार पावसामुळे शहराला चांगलाच फटका बसला असून, रात्री बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याचे दिसले.

मुंबई किनारपट्टीवर बुधवारी (दि. ३) धडकलेल्या ‘निसर्ग’ चक्रीवादळाने दुपारनंतर उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण केले. सकाळपासून शहरात पावसाची संततधार सुरू होती. चक्रीवादळ नाशिककडे सरकत असल्याने, दुपारी साडेचारला पावसाचा जोर अधिक वाढला. मुंबई किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकल्यावर शहरात ३० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहणारे वारे, साडेचार ते पाच या वेळेत ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहिले. यामुळे शहरातील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झाले. चक्रीवादळामुळे तापमान थेट पाच अंशांनी घटले असून, बुधवारी २४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. वादळी वाऱ्यामुळे घरांचे, दुकानांचे पत्रे वाजू लागले. झाडे मोठ्या प्रमाणात हलण्यास सुरुवात झाली. त्यामुळे दुपारी अडीचनंतर बऱ्यापैकी दुकाने बंद करण्यात आली. अनेक खासगी कार्यालयांना सुटी देण्यात आली. साडेचारनंतर पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील विविध भागातं झाडे कोसळली. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सायंकाळी साडेपाचपर्यंत २३.२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, चक्रीवादळाच्या भीतीने शहरातील आस्थापने दुपारी दीडनंतर बंद करण्यात आली. त्यामुळे दुपारी दोननंतर शहरातील वर्दळ मंदावल्याचे जाणवले.

Bगटारी ओव्हरफ्लोB

दुपारनंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे काही भागात पाणी साचले. वडाळा गाव, सिडको, सातपूर, जुने नाशिक या भागातील गटारी ओव्हर फ्लो झाल्या. गटारीचे पाणी रस्त्यांवरून वाहत नदी-नाल्यांत मिसळले. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांत पाणी तुंबल्याचे दिसले. नदीच्या पातळीतही रात्री उशिराने वाढ झाल्याचे दिसले.

Bजोर कायम राहीलB

चक्रीवादळ पुढे सरकले असले, तरी पावसाचा जोर कायम असेल. गुरुवारी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस होईल. बुधवारी दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे गुरुवारी सायंकाळपर्यंत ४० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद होईल. वाऱ्याचा वेग कमी-जास्त होत आहे. गुरुवारीदेखील ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा अंदाज नाशिक हवामान केंद्राने वर्तविला आहे.

Bयेथे झाली वृक्षहानीB

शहरात सकाळपासून वादळी वाऱ्यामुळ‌े बारा झाडे कोसळली. शालिमार परिसरातील कब्रस्तान, काठे गल्ली, शिंगाडा तलाव, वडाळा नाका, पंपिंग स्टेशन, महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनी भागात प्रत्येकी एक, तर सातपूर, नाशिकरोड, पंचवटी भागात प्रत्येकी दोन झाडे कोसळली आहेत. यासह इतर ठिकाणी झाडांच्या फांद्या किरकोळ स्वरूपात पडल्या आहेत. पंपिंग स्टेशन येथे झाडाची फांदी पडल्याने एक महिला किरकोळ जखमी झाली.

Bवाड्याचा भाग काढलाB

शहरात पावसाला सुरुवात झाल्यानंतर धोकादायक वाडे पाडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या रविवार पेठेतील दीपक पंपालिया यांच्या वाड्याचा काही भाग दुपारी साडेतीनला काढण्यात आला.

हे वादळ नाशिकमार्ग धुळ्याकडे जाईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. परंतु ऐनवेळी त्याने दिशा बदलली. नाशिक आणि पुणेच्या मध्य भागातून ते उत्तर पुर्वकडे गेले. त्यामुळे त्याचा बाह्य भाग नाशिकसह सिन्नर, निफाड, येवला या तालुक्यांना स्पर्श करून गेला. दिशा बदलल्याने हे वादळ प्रभावहीन ठरले. रात्री सात ते नऊ या कालावधीत त्याचा काहीअंशी प्रभाव जाणवला.

– भागवत डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारीSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Raosaheb Danve: प्रकल्प संचालकांना पाच हजार रुपये दंड – aurangabad municipality civic chief astik kumar pandey fined 5000 rupees to project director of rural...

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाददिशा समितीच्या बैठकीसाठी उपस्थित असलेल्या मान्यवरांसाठी प्लास्टिकच्या आवरणात गुंडाळून पुस्तके आणल्यामुळे ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांना महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय...

CSK: चेन्नई एक्स्प्रेस नव्हे ही तर मालगाडी; भारतीय क्रिकेटपटूची टीका – aakash chopra says chennai express now became goods train

नवी दिल्ली:IPL 2020 आयपीएलच्या १२ हंगामात सर्वात सातत्यापूर्ण कामगिरी करणारा संघ म्हणून चेन्नई सुपर किंग्जकडे (Chennai Super kings) पाहिजे जाते. पण या वर्षी...

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा दुसऱ्यांदा लांबणीवर

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा सुरू झालेल्या परतीच्या पावसाने शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांना दुसऱ्यांदा दणका दिला आहे. या पावसामुळे विद्यापीठाने उद्या पासून सुरू...

Recent Comments