Home शहरं नाशिक ‘निसर्ग’चा खान्देशलाही बसणार फटका!

‘निसर्ग’चा खान्देशलाही बसणार फटका!


हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने घोंगावणाऱ्या निसर्ग चक्रीवादळाचा फटका खान्देशलाही बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सूनपूर्व वादळी पावसाने मध्यरात्री जळगाव जिल्ह्यात हजेरी दीली. तासभर चाललेल्या वादळी पावसाने जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले. तसेच ३ व ४ जून रोजी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

सोमवारी जळगावात झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले, तर तारा पडून वीजपुरवठा खंडीत झाला होता. या वादळी पावसामुळे गेल्या दोन महिन्यांपासून अंगाची लाही लाही करणाऱ्या उन्हाच्या चटक्यांनी कंटाळलेल्या जळगावकरांना काहीसा दिलासा मिळाला. दरम्यान शहरातील निवृत्ती नगरभागातील अनेक घरांमध्ये गटारीचे पाणी घुसल्याने नागरिकांचे हाल झालेत. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम परिसर, आकाशवाणी चौक, गुजराल पेट्रोलपंप परिसर, शिवाजीनगर, नवीन बजरंग बोगदा, एसएमआयटी महाविद्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.

धुळ्यालाही इशारा

धुळे : महाराष्ट्रातील अरबी समुद्रामार्गे चक्रीवादळ वेगाने किनापट्टीकडे पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ मुंबई, नाशिकमार्गे गुरुवार ४ जून रोजी धुळे जिल्ह्यात दाखल होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मध्यरात्री जोरदार पाऊसाचे आगमन झाले. मंगळवारी शहरात दिवसभर ढगाळ वातावरण कायम दिसून आले. सकाळी थोडीफार पावसाची रिपरिपही सुरू होती.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

health care tips in marathi : काढ्याचं अतिसेवन करताय? मग जाणून घ्या डॉक्टरांनी दिलेली ही माहिती – excessive consumption of kadha can be dangerous...

रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या काढ्यांची माहिती देणारे व्हिडीओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. ते बघून अनेक जण काढ्याचं सेवन करतात. कित्येकदा करोना...

Recent Comments