Home शहरं मुंबई निसर्ग चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने; पुढील सहा तासांत तीव्रता कमी होणार

निसर्ग चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने; पुढील सहा तासांत तीव्रता कमी होणार


मुंबईः कोकण किनारपट्टीवर धडकल्यानंतर चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्राच्या दिशेनं सरकले आहे. निसर्ग चक्रीवादळाचे काही तास महत्त्वाचे ठरणार असून पुढील सहा तासांत वादळाची तीव्रता कमी होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

निसर्ग चक्रीवादळ सुमारे एकच्या सुमारास अलिबागच्या किनारपट्टीवर धडकले. अलिबाग जिल्ह्यातील अनेक भागांत वादळाचा तडाखा बसला. सध्या या वादळाची तीव्रता ९०-१०० किलोमीटर प्रती तास ते ११० किलोमीटर प्रतीतास इतकी असून पुढील सहा तासांत हे चक्रीवादळ ईशान्य दिशेला वळणार असून त्याची तीव्रताही कमी होणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. तसंच, संपूर्ण वादळ जमीनीवर येण्यास अजून किमान तासभर लागणार असल्याचंही हवामान विभागाकडून सांगण्यात येतंय.

वाचाः
दरम्यान, कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरून घोंगावत आलेले वादळानं रत्नागिरी, रायगडमध्ये बरेच नुकसान केलं आहे. वादळानं दिशा बदलल्यानं वाऱ्याचा जोरही वाढला आहे. मुंबई- पुण्यात अनेक ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. तर काही भागांत वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. निसर्ग वादळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्व यंत्रणा सज्ज आहे. एनडीआरएफची टीमही समुद्र किनाऱ्यांवर तैनात केली आहे.

वाचाःSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mamata Banerjee: ‘असा गृहमंत्री आपण यापूर्वी कधीच पाहिला नाही’ – mamata banerjee alleges pm modi amit shah and bjp farmers protest coronavirus issue

कोलकाताः पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक ( west bengal election ) जवळ येताच राजकारणाचा पारा चढत चालला आहे. मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता...

virat kohli: रोहित शर्माच्या दुखापतीबाबत कर्णधार विराट कोहलीने सोडले मौन, म्हणाला… – indian captain virat kohli opens up on lack of clarity, confusion over...

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्यापासून एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. पण ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरु होण्यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने रोहित शर्माच्या...

Sandeep Kulkarni Shares View On Technology And World – एखाद्या गोष्टीची जाणीव होत नाही, तोवर त्याची किंमत कळत नाही- संदीप कुलकर्णी

संदीप कुलकर्णीपहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं, तेव्हा आपला जन्मही झाला नव्हता. त्या काळात जगातल्या काही देशांना या महायुद्धांची चांगलीच धग लागली. पण, करोनाच्या...

Recent Comments