Home ताज्या बातम्या नेहा कक्कर अडकली लग्नाच्या बेडीत; दिल्लीच्या गुरुद्वारामध्ये विवाह संपन्न, पाहा VIDEO neha-kakkar-rohanpreet-singh-wedding-in-gurudwara-paink-outfits-mhaa...

नेहा कक्कर अडकली लग्नाच्या बेडीत; दिल्लीच्या गुरुद्वारामध्ये विवाह संपन्न, पाहा VIDEO neha-kakkar-rohanpreet-singh-wedding-in-gurudwara-paink-outfits-mhaa | News


बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) यांचं लग्न थाटात संपन्न झालं आहे. आता लवकरच नेहाचं रिसेप्शन होणार आहे. यात बॉलिवूडचे कलाकारही उपस्थित राहणार आहेत.

दिल्ली, 24 ऑक्टोबर: अनेक दिवसांपासून ज्या ग्रँड वेडिंगची चर्चा सुरू होती ते आज पार पडलं आहे. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह यांचा लग्नसोहळा संपन्न झाला आहे. दिल्लीच्या गुरुद्वारामध्ये नेहा आणि रोहनप्रीत लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. गुलाबी रंगाच्या शेडमध्ये नेहाने लग्नाचा लेहंगा घातला होता. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अतिशय पारंपरिक पद्धतीने झालेल्या या लग्नसोहळ्यामध्ये दोघांचंही कुटुंब आणि मित्रपरिवार उपस्थित होता.

पंजाबमध्ये त्यांचं रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनला त्यांचं कुटुंब आणि बॉलिवूडमधील काही कलाकारही उपस्थित राहणार आहेत. नेहाच्या हळदीचे, संगीत सेरिमनीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत होते. तिच्या चाहत्यांना आता तिच्या लग्नाचीच प्रतीक्षा होती. अखेर नेहाने रोहनप्रीतच्या गळ्यात माळ घातली. नेहा आणि रोहनप्रीतचे फॅन्स तिला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत.

नेहा कक्कर नेमकं कोणाशी लग्न करणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून जोडल्या गेल्या होत्या. तिचं नाव काही तरुणांशी जोडलं गेलं होतं. पण आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.


Published by:
Amruta Abhyankar


First published:
October 24, 2020, 4:59 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

जिल्हाधिकाऱ्यांच्या हाती धुरा

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड प्रभावित राज्यांतून महाराष्ट्रात हवाई आणि रेल्वेमार्गाने प्रवेश करणाऱ्या नागरिकांसाठी करोना चाचणीचे प्रमाणपत्र सक्तीचे असून, संसर्ग नसलेल्या नागरिकांनाच राज्यात प्रवेशास...

Maharashtra govt employees strike: Maharashtra Strike: संपाआधीच ठाकरे सरकारचा इशारा; ‘त्या’ कर्मचाऱ्यांवर होणार मोठी कारवाई – will take action against employees if they go...

मुंबई: राज्य शासकीय कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात उद्या (गुरुवारी) संपावर जात आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनांनी तशी नोटीस शासनाला दिली आहे. त्या...

aurangabad News : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना घरीच मतदानाची सोय – senior citizens, disabled people can vote at home

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद,पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत असलेले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना 'मोबाइल पोलिंग बुथ'च्या माध्यमातून त्यांच्या घरीच गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा...

Recent Comments