Home देश पंतप्रधान नरेंद्र मोदी : मन की बात: भारतात करोनाविरुद्धची लढाई 'पीपल ड्रिव्हन'...

पंतप्रधान नरेंद्र मोदी : मन की बात: भारतात करोनाविरुद्धची लढाई ‘पीपल ड्रिव्हन’ – पंतप्रधान मोदी – prime minister narendra modis mann ki baat, 26 april 2020


नवी दिल्ली : नेहमीप्रमाणे आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’द्वारे देशवासियांना संबोधित करत आहेत. देशात सुरू असलेल्या करोना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या या संबोधनाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून आहे. दरम्यान, देशात करोना व्हायरसबाधित रुग्णांची संख्या २६,४९६ वर पोहचलीय. तर करोनामुळे ८२४ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत. एकूण रुग्णांपैंकी ५,८०४ जणांवर उपचार यशस्वी ठरलेत. तर देशात वेगवेगळ्या रुग्णालयांत १९ हजार ८६८ जणांवर उपचार सुरू आहेत

‘मन की बात’

>> करोनामुळे मोठे बदल झालेत. लोक मास्कचा वापर करत आहेत. आता मास्कप्रती लोकांची धारणा बदलणार आहे. आता मास्क हे सभ्य समाजाचं प्रतिक बनेल

>> आपण अनेकदा आपल्या शक्तींना मानण्यास नकार देतो आणि जेव्हा देश याबाबत संशोधन करण्याची गोष्ट करतो तेव्हा आपण त्याला मानतो. याच कारणानं वर्षानुवर्ष गुलामीत जगावं लागलं. भारताच्या तरुण पीढीला या आव्हानाला स्वीकार करावं लागेल. जसं जगानं योग स्वीकारला तसंच आयुर्वेदही जगाला स्वीकारावा लागेल

>> आज भारतातील आयुर्वेदाचे लोक विशिष्ट भावनेसहीत पाहत आहेत. करोनाच्या दृष्टीनं रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जो प्रोटोकॉल देण्यात आलाय त्याचा तुम्ही उपयोग करत असाल, अशी मला आशा आहे

>> उलट आपल्या हक्काच्या गोष्टींसहीत जे दुसऱ्यांची मदत करतात, स्वत:ची चिंता सोडून आपल्या वाट्यानं दुसऱ्यांची गरज पूर्ण करतात ती संस्कृती आहे

>> जे माझं नाही ते मी दुसऱ्याकडून हिसकावून घेत असेल तर आपण त्याला विकृती म्हणतो : पंतप्रधान मोदी

>> अगोदर पोलिसांबद्दल विचार करताना नकारात्मकतेशिवाय काहीच समोर दिसत नव्हतं. आता आपले पोलीस कर्मचारीच लोकांपर्यंत जेवण पोहचवण्याचं काम करत आहेत

>> देशातील वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत लोकांनी नागरिकांनी असंतोष व्यक्त केलाय. या अध्यादेशात वैद्यकीय कर्मचाऱ्यांविरोधात हिंसेवर कडक शिक्षेची तरतूद करण्यात आलीय

>> आपल्या सहकाऱ्यांनी कमीत कमी वेळात तीन लाख किलोमीटरचं उड्डाण घेतलंय. तसंच ५०० टन मेडिकल सामग्री देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचलंय. सोबतच रेल्वेही दिवस-रात्र काम करत आहे

>> cavidworriors.gov.in सरकारनं या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सिव्हिल सोसायटीच्या प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाला जोडलंय. यात आत्तापर्यंत सव्वा करोड लोक जोडले गेलेत

>> गेल्या काही वर्षांत आपल्या देशात हे मदतीचं वातावरण तयार झालंय. लाखोंनी आपल्या गॅस सबसिडीवरही पाणी सोडलं

>> कुणी पगार देतोय, कुणी मास्क बनवतोय तर कुणी आपल्या शेतातील भाज्या दान देतोय. कुणी ज्या शाळेत क्वारंटाईन आहेत त्याचं शाळेची रंगरंगोटी करत आहेत, हाच भाव करोनाविरुद्धच्या लढाईत ताकद देतोय

>> संपूर्ण जग या महामारीशी झुंज देत असताना, देशातला प्रत्येक नागरिक या लढाईतला सैनिक बनलाय. भविष्यात याची चर्चा होईल तेव्हा भारतातील पीपल ड्रिव्हन लढाईची चर्चा जरूर होईल

>> भारतात करोनाविरुद्धची लढाई ‘पीपल ड्रिव्हन’ आहे. ही जनतेची लढाई बनलीय : मोदी

>> आज संपूर्ण देश एक लक्ष्य गाठण्यासाठी एका दिशेनं प्रवास करत आहे

>> जनतेसोबत मिळून शासन कोविड १९ शी लढाई करत आहे

>> तुम्ही सर्व लॉकडाऊनमध्ये ‘मन की बात’ ऐकत आहात. सध्या अनेक फोन कॉल आणि लोकांच्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहचत आहेत. जास्तीत जास्त वाचण्याचा आणि ऐकण्याचा प्रयत्न आहे : पंतप्रधान मोदी

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

madhurta deshmukh: घरबसल्या गोष्टी ऐका आजी-आजोबांकडून – storyteller madhurata deshmukh is present stories for children under spin a yarn india using youtube and facebook

हर्षल मळेकर, मुंबईआजी-आजोबांच्या कुशीत शिरुन कोल्होबा, कावळा, सिंह-उंदिर यांच्या तसेच राम-कृष्णाच्या, बिरबलाच्या गोष्टी ऐकत झोपी जायचे हे भाग्य विभक्त कुटुंब पद्धतीमुळे हल्ली फार...

Nitin Bhalerao Martyr: छत्तीसगडमधील नक्षली हल्ल्यात नाशिकचे जवान नितीन भालेराव यांना वीरमरण – assistant commandant of crpf nitin bhalerao martyred, 9 injured in naxal...

नाशिक: छत्तीसगडमध्ये सुकमा येथे नक्षलवाद्यांनी घडवून आलेल्या स्फोटात सीआरपीएफचे जवान नितीन भालेराव शहीद झाले आहेत. या स्फोटात एका अधिकाऱ्यासह ९ जवान जखमी झाले...

Recent Comments