शिवसेना पक्ष प्रमुख आणि महराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या चीन संदर्भातील सर्व पक्षीय बैठकीत सहभागी झाले.
मुंबई, 19 जून: शिवसेना पक्ष प्रमुख आणि महराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या चीन संदर्भातील सर्व पक्षीय बैठकीत सहभागी झाले. बैठकीत उद्धव ठाकरे यांनी चीनबाबत राग व्यक्त केला. ते म्हणाले की, भारत शांत आहे. याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असा होत नाही. भारत मजबूत आहे, मजबूर नाही. आमच्यात डोळे काढून हातात देण्याची क्षमता आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी चीनला इशारा दिला.
आपण सगळे एक आहोत. चीनविरोधात सरकार जे काही निर्णय घेईल, त्याला पाठिंबा असेल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. लष्करातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांही आमचा पाठिंबा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला 20 राजकीय पक्षांना निमंत्रण होतं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांनी आपण सरकारसोबत असून, महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
Tags:
First Published: Jun 19, 2020 08:46 PM IST