Home शहरं अहमदनगर परप्रांतीय मजुराचा सारीमुळे मृत्यू

परप्रांतीय मजुराचा सारीमुळे मृत्यूम. टा. वृत्तसेवा, पारनेर

परजिल्ह्यातून पारनेर तालुक्यातील हंगा येथे मजुरी करून पोट भरण्यासाठी आलेल्या २८ वर्षीय दिव्यांग युवकाचा गुरुवारी ‘सारी’ आजाराने मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यात एकही करोना किंवा सारीचा रुग्ण नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लोळगे यांनी केले आहे.

विदर्भातून अनेक कुटुंबे रोजगारासाठी नगर जिल्ह्यात येतात. मागील महिन्यात वाशिम जिल्ह्यातील एक कुटुंब हंगा येथील शेतकऱ्याच्या शेतात रोजगारासाठी आले होते. संबंधित शेतकऱ्याच्या शेतातील काम संपल्यानंतर ते कुटुंब तेथून दुसरीकडे गेले. या कुटुंबात एक दिव्यांग युवक होता. या युवकाला सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाल्यानंतर त्याला उपचारासाठी सात एप्रिलला पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्रास वाढल्यानंतर त्याला ग्रामीण रग्णालयातून नगरला हलविण्यात आले होते. त्याची करोना चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर त्याला पुन्हा पारनेरला पाठवण्यात आले. सकस आहाराअभावी प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्याचा त्रास बळावला. त्या युवकाला पुन्हा दुसऱ्या दिवशी नगरला हलविण्यात आले. त्याची पुन्हा करोना व सारीची टेस्ट घेण्यात आली. या वेळी त्याला सारीचा आजार झाल्याचे निष्पन्न झाले. उपचार सुरू असताना त्याचा गुरुवारी (२३ एप्रिल) रात्री मृत्यू झाला. तहसीलदार ज्योती देवरे यांनी संबंधित मृत युवकाची बहिण व नातेवािकांना आर्थिक मदत करून नगरला पाठवले.

लोकांनी घाबरू नये : डॉ. लोळगे

यासंदर्भात पारनेर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे पारनेर तालुक्यात अद्यापपर्यंत एकही करोना वा सारीचा रुग्ण सापडलेला नाही. संबंधित मृत युवक हा परजिल्ह्यातील होता. तालुक्यातील जनेतेने घाबरून जाऊ नये, असे आवाहन केले.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

वल्गनांना तडाखे

राज्यातल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील पाच व धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील एक, अशा सहा विधान परिषदांच्या जागांच्या निवडणुका पार पडल्या. यात काँग्रेसमधून भाजपमध्ये...

Recent Comments