Home मुंबई नवी मुंबई परीक्षेच्या निर्णयावर संस्थांची नाराजी

परीक्षेच्या निर्णयावर संस्थांची नाराजी



म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

‘अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना विविध सत्रांत मिळालेल्या गुणांची सरासरी देऊन निकाल द्यावेत, अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेली घोषणा विविध अभ्यासक्रमांच्या शैक्षणिक संस्थांवर नियंत्रण असणाऱ्या अभ्यास संस्थांना पटली नसून त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

देशात करोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे शैक्षणिक संस्था बंद आहेत. परिणामी, पदवीच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षाही रखडल्या होत्या. या परीक्षा नेमक्या कशा घ्यायच्या याबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. यानुसार राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या समितीने अंतिम वर्षाच्या परीक्षा जुलै महिन्यात घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाची परीक्षा न घेता आतापर्यंतच्या सत्राच्या गुणांची सरासरी काढून गुणदान केले जाईल, असे जाहीर केले. या घोषणेनंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली. देशातील अभियांत्रिकी कॉलेजे हे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या मार्गदर्शनानुसार काम करतात. त्यांचे अभ्यासक्रम कसे असावेत, हे ठरविण्याचे अधिकारही परिषदेला आहेत. ही परिषद राज्य सरकारच्या या निर्णयाला अनुकूल दिसत नाही. कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन न करता निकाल देणे चुकीचे असल्याचे मत परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केले. मूल्यांकनाच्या विविध प्रक्रिया आज उपलब्ध आहेत. यात तोंडी परीक्षेपासून ते बहुपर्यायी परीक्षांचा पर्यायही उपलब्ध होऊ शकतो का, याचा विचार होणे आवश्यक असल्याचे सहस्रबुद्धे म्हणाले. तर, याबाबत वास्तूकला परिषदेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याची सूचना केली आहे. याचबरोबर परीक्षा ऑनलाइन करण्याची सूचनाही या पत्रात केली आहे. या परिषदेमध्ये विद्यार्थ्यांना नोंदणी करायची असेल, तर त्यांना कायद्यानुसार विहित अर्हता पूर्ण करणे आवश्यक आहे. जर मूल्यांकन झालेच नाही, तर ती अर्हता पूर्ण करणे अवघड होईल, असेही परिषदेचे कुलसचिवव आर. के. ओबेरॉय यांनी लिहलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. ही परीक्षा कशी घ्यायची, याबाबत संस्थांना एप्रिल महिन्यात सूचना करण्यात आल्याचेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. या सर्वांबाबत; तसेच राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत कोणतेही मत व्यक्त करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने नकार दिला आहे. आयोगाने यापूर्वीच विद्यापीठांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विद्यापीठांनी स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यावा असे सूचित केल्याचे आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

बार कौन्सिलचा निर्णय रविवारी

विधी अभ्यासक्रमावर नियंत्रण ठेवणारी संस्था ‘बार कौन्सिल ऑफ इंडिया’ याबाबत येत्या रविवारी बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे ‘बार कौन्सिल’चे सतीश देशमुख यांनी स्पष्ट केले.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Corona Crisis: शाळा उघडली, तरीही… – sujata patil article on corona crisis impact on education system

सुजाता पाटीलकरोनाच्या विषाणूमुळे अविश्वसनीयरीत्या सगळ्या जगाचा कारभार बंद पडला. जगण्याच्या प्रत्येक क्षेत्रावर करोनाचा परिणाम झाला असून, शिक्षण क्षेत्राला तर समूळ हादरा बसला.मार्च महिन्यापासून...

BSF Jawan in Honey Trap: बीएसएफ जवानांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये ‘त्याने’ पाकिस्तानी महिलेला अॅड केले! – bsf jawan from ahmednagar honey-trapped by pakistani agent

अहमदनगर: नगर शहरापासून जवळच असलेल्या ससेवाडी येथील प्रकाश काळे हा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान पाकिस्तानी महिला एजंटाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला. पंजाबमध्ये पाक...

andre russell: IPLमध्ये अपयशी; आता १४ चेंडूत केल्या ५० धावा! – lpl 2020 andre russell hits fifty in 14 ball in lanka premier league

नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे मालिका सुरु आहे. तर न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात टी-२० मालिका सुरू आहे. करोना व्हायरसनंतर क्रिकेट...

Recent Comments