Home शहरं नाशिक पसायदान: माउलींच्या पसायदानाला काश्मिरी भाषेचं कोंदण - the kashmiri language is associated...

पसायदान: माउलींच्या पसायदानाला काश्मिरी भाषेचं कोंदण – the kashmiri language is associated with mauli’s pasaydana


fanindra.mandlik@timesgroup.com

‘आता विश्वात्मके देवे। येणे वाग्यज्ञे तोषावे। तोषोनि मज द्यावे। पसायदान हे।।’

ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचे समापन या प्रार्थनेने केले आहे. यात सांगितल्याप्रमाणे ‘सर्वच सर्वांचे मित्र होत’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून सरहद ही संस्था करीत आहे. माउलींनी लिहिलेले पसायदान सरहद संस्थेने काश्मिरी भाषेत ध्वनिमुद्रित केले असून, ते गाण्याचा मान नाशिकच्या प्रांजली बिरारी-नेवासकर या गायिकेला मिळाला आहे.

संत ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणसाठी रचलेले पसायदान काश्मिरीमध्ये भाषांतरित करून नवीन रुपात संगीतबद्ध करून गायन सादर करण्याचा हा पहिलाच प्रयोग होता. संजय नहार हे सरहद या संस्थेचे संस्थापक आहेत आणि दोन दशकांहूनही अधिक काळापासून सीमेवरील राज्यांमध्ये शांतता आणि सामाजिक उन्नतीसाठी कार्य करीत आहेत. सामाजिक कार्याबरोबरच त्यांनी संगीताच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेच्या हेतूने यूट्यूबवर सरहद म्युझिक हे चॅनल सुरू केले आहे. त्याद्वारे संत आणि महान कवींनी दिलेला मानवतेचा संदेश विविध भाषांतील गीतांमधून जनतेपर्यंत पोहोचविला जातो. याच उपक्रमांतर्गत संत ज्ञानेश्वरांचे पसायदान काश्मिरी भाषेत सादर करण्यात आले आहे.

सर्वांत अगोदर साहिबो ही काश्मीरमध्ये प्रचलित असलेली कवी गुलाम अहमद मेहजूर यांनी लिहिलेली प्रार्थना सरहद यूट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध केली. या प्रार्थनेत कवी मेहजूर यांनी अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश दिला आहे. या प्रार्थनेला काश्मीरमध्ये भरभरून प्रतिसाद मिळाला. काही दिवसांतच ही प्रार्थना लाखो लोकांपर्यंत पोहोचली. त्यानंतर सरहदतर्फे काश्मिरी भाषेत पसायदान प्रकाशित केले. काश्मीरमधील सद्यस्थिती पाहता कवी मेहजूर यांची शांतीचा आणि प्रेमाचा संदेश असलेली गाणी निवडली आहेत.

भाषा-शब्दांचा अभ्यास अन् सराव

पसायदानाचे काश्मिरी भाषांतर प्रेमनाथ शाद यांनी केले आहे. मजहर सिद्दिकी आणि शमीमा अख्तर यांनी ते संगीतबद्ध केलेले असून, त्याचे गायन प्रांजली बिरारी-नेवासकर यांनी केले आहे. पसायदानाच्या निर्मितीबद्दल नहार यांनी महाराष्ट्रीयन मुलीने काश्मिरी गाणी गाण्याची कल्पना सांगितली. त्यासाठी प्रांजली यांनी काश्मिरी भाषेचा व शब्दांचा अभ्यास करून सातत्याने सराव करीत काश्मिरी भाषेत पसायदान स्वरबद्ध केले आहे.

माझ्यासाठी हा अनुभव खरोखर अविस्मरणीय आहे. कारण, या नवीन प्रयोगात मला काश्मिरी भाषा आणि संस्कृतीचे सौंदर्य अभ्यासायला मिळाले. राष्ट्रीय एकात्मतेच्या हेतूने केलेल्या उपक्रमासाठी माझी कला सादर करण्याची संधी मिळणे याचा मला खूप आनंद आणि समाधान आहे.

-प्रांजली बिरारी-नेवासकर, गायिकाSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ind vs eng test: भारत विरुद्ध इंग्लंड: प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार का? BCCIने घेतला हा निर्णय – england tour of india 2021 ind vs...

चेन्नई: ind vs eng भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारे पहिले दोन कसोटी सामने चेन्नईतील चिंदम्बरम स्टेडियमवर होणार आहे. करोनानंतर भारतात प्रथमच आंतरराष्ट्रीय सामना...

coronavirus updates: Coronavirus updates ‘करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती’ – coronavirus updates new coronavirus strain might be related to high mortality rate...

लंडन: मागील महिनाभरापासून ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनने थैमान घातले आहे. करोनाच्या या नव्या स्ट्रेनमुळे विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने होत असून बाधितांच्या संख्येत वाढ...

msedcl in financial crisis: महावितरणमध्ये आर्थिक आणीबाणी – msedcl has directed to all division to recovered arrears from electricity consumer to save from financial...

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोडथकबाकीचा डोंगर वाढल्याने महावितरणची आर्थिक स्थिती मोठ्या प्रमाणात खालावली आहे. महावितरणला दैनंदिन कामकाजाचा खर्च भागविण्यासह कर्मचाऱ्यांचे वेतन देणेही कठीण झाले...

Recent Comments