Home शहरं औरंगाबाद पांढऱ्या सोन्याची बळीराजाला चिंता

पांढऱ्या सोन्याची बळीराजाला चिंता


शासकीय कापूस खरेदीकडे शेतकरी आस लावून ; खरेदीबाबत निर्देश नसल्याने खरेदी बाबत सांशकता

म. टा. प्रतिनिधी, कन्नड

लॉकडाऊनमुळे कन्नड तालुक्यातील ३० टक्के शेतकऱ्यांकडे कापूस विक्रीअभावी पडून आहे. भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खरेदी बंद केल्याने व खाजगी खरेदीदार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनस्तरावरून २० एप्रिलपासून खरेदी सुरू होणार असल्याची चर्चा आहे. त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. बाजार समितीकडे अद्याप खरेदी सुरू करण्याबाबत कसल्याही सूचना नाही. ‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमी ‘सोशल डिस्टंसिंग’ची अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याने खरेदीचा मुहूर्त कधी लागेल याबाबत साशंकता आहे.

कन्नड तालुक्यात सुमारे ४८ हजार ७७० हेक्टरवर यंदा कापसाची लागवड करण्यात आली आहे. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये ‘सीसीआय’च्या माध्यमातून कापूस खरेदी करण्यात आली. त्यानंतर कापूस खरेदी बंद करण्यात आली. मार्चमध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दूभाव दिसू लागल्याने खाजगी जीनिंग व कापूस खरेदीदार यांनी खरेदी बंद केल्याने जवळपास २५ ते ३० टक्के शेतकऱ्यांकडे सुमारे दीड लाख क्विंटल कापूसविक्रीविना पडून आहे. ‘लॉकडाऊन’मुळे कापसाला खरेदीदार मिळणे कठीण झाले आहे. वेचणी खर्च व घसरलेले यंदाचे उत्पन्न यांमुळे उत्पादन खर्चास परवडला नाही. या कापसाला खरेदीदार मिळतो की नाही, असा प्रश्न उत्पादक शेतकऱ्याला पडला आहे.

स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीकडे ‘सीसीआय’कडून व शासनस्तरावरून कसलेही निर्देश मिळाले नसल्याने, ‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर व ‘सोशल डिस्टंसिंग’ची पूर्तता महत्त्वाची आहे. त्यामुळे कापसाच्या शासकीय खरेदीला कधी मुहूर्त लागतो याबाबत साशंकता आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस खरेदीबाबत रविवारपर्यंत (१९ मार्च) कसलेही निर्देश आले नसल्याचे सचिव के. बी. वानखेडे यांनी सांगितले आहे.

Bसरकारकडून खरेदीबाबत निर्देश नाहीतB

करोना विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’ची घोषणा करण्यात आली. कापूस जीनिंगवर काम करणारे बहुतांश मजूर मध्य प्रदेशतील आहेत. ते मजूर निघून गेल्याने, त्याचा परिणाम या खरेदीवर होणारा आहे. बाजार समितीमार्फत कापूस खरेदीबाबत रविवारीपर्यंत (२० मार्च) कसलेही निर्देश नसल्याचे सचिव के. बी. वानखेडे यांनी सांगितले आहे

मार्च महिन्यापासून हमी दराने खरेदी बंद आहे. ‘लॉकडाऊन’ झाल्यापासून कुणीही कापूस खरेदीदार नसल्याने विक्रीअभावी कापूस अद्याप घरीच पडून आहे. मान्सूनपूर्व मशागतीची कामे आल्याने कापूस विक्रीची चिंता सतावत आहे.

– आबासाहेब आहेर, कापूस उत्पादक शेतकरी, टाकळी (लव्हाळी), ता. कन्नडSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Chloe Zhao: आशियाचा सन्मान : क्लोई जाओ – chloe zhao is becoming the first asian woman to ever win the prize for best director

'करुणा सर्व बंधने पार करते आणि मग तुमची वेदना माझी वेदना बनते...' गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका क्लोई जाओ यांनी याच कार्यक्रमात व्यक्त...

LIVE : मुंबईसाठी आरोग्य विभागाचं मोठं पाऊल, आता 3 ऐवजी 29 रुग्णालयांमध्ये लसीकरण | News

7:04 am (IST) विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसरा दिवस राज्यपालांच्या अभिभाषणावर होणार चर्चा चर्चेचा दुसरा आणि अंतिम दिवस चर्चेला मुख्यमंत्री उद्धव...

illegal parking in mumbai: अवैध पार्किंग जोरात – mumbai traffic police not strict action against illegal road parking in mumbai

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईमहापालिकेने आपल्या वाहनतळांच्या परिसरातील अवैध पार्किंगवर कारवाईचे अधिकार वाहतूक पोलिसांना दिले. मात्र पोलिसांनी अद्याप ही कारवाई सुरू केलेली नाही....

Recent Comments