Home ताज्या बातम्या पाकिस्तानातल्या ‘या’ शहरांमध्ये आहेत भारताचे गुन्हेगार, ISIने दिलं संरक्षण, Pakistan protect terrorist...

पाकिस्तानातल्या ‘या’ शहरांमध्ये आहेत भारताचे गुन्हेगार, ISIने दिलं संरक्षण, Pakistan protect terrorist leaders isi provide security to them says intelligence report mhak | National


पंतप्रधान इम्रान खान यांनी तर ओसामा हा शहीद झाला अशी मुक्ताफळंही संसदेत बोलतांना उधळली होती.

नवी दिल्ली 28 जून: मुंबई आणि पुलवामा बॉम्बस्फोटातले (Mumbai and Pulwama bomb blast ) दहशतवादी पाकिस्तानात (Pakistan) दडून बसले असल्याची माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी बॉम्ब स्फोट झाले होते. साजिद मीर हा त्याचा मास्टर माईंड होता. तर 2019च्या पुलवामा हल्ल्याचा मसूद अजहर हा सूत्रधार होता. या दोघांनाही पाकिस्तानने संरक्षण दिल्याचं अमेरिकेच्या  अहवालात (United stats of America) म्हटलं आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ही भारताचे गुन्हेगार असलेल्या या दहशतवाद्यांना संरक्षण देत आहे. मीर हा रावळपींडी इथं गार्डन व्हिला हाऊसिंग सोसायटी किंवा लाहोरच्या फैजल टाउन किंवा गंदा नाला या ठिकाणी राहात असावा अशी शक्यता गुप्तचर सूत्रांनी व्यक्त केली आहे.

मीर हा लष्करे तोबाचा म्होरक्या जकी उर रहमान यांचा अंगरक्षक होता. तो अतिरेक्यांना प्रशिक्षण देत असे. ISIने त्याला अतिशय कडक सुरक्षा दिली असून त्याचे सात फेरे असल्याचं म्हटलं जातं. मुंबई हल्ल्यानंतर त्याने प्लॅस्टिक सर्जरी केली आहे.

Lockdown की Unlock-2? देशातल्या राज्यांमध्ये असे आहेत नियम, वाचा एका CLICKवर

तर जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहर हा रावळपींडीत जैशच्या मुख्यालयात दडून बसल्याची माहिती आहे. त्यालाही पाकिस्तानने संरक्षण दिलं आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना मोकाट रान देऊ नये अशी ताकिद अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी दिली होती. त्यानंतर पाकिस्तानने थातूर मातूर कारवाई करत काही दहशतवाद्यांना अटकही केली होती. मात्र ती धूळफेक असल्याचं नंतर सिद्ध झालं.

गलवान खोऱ्यात किती चिनी सैनिकांचा झाला मृत्यू? सरकार गप्प; कुटुंबीय संतापले

पंतप्रधान इम्रान खान यांनी तर पाकिस्तानने अमेरिकेला मदत केली ही सर्वात मोठी चूक होती असं वक्तव्य नुकतच पाकिस्तानच्या संसदेत बोलतांना केलं होतं. ओसामा हा शहीद झाला अशी मुक्ताफळंही त्यांनी उधळली होती.

संपादन – अजय कौटिकवार

 

 

First Published: Jun 28, 2020 08:10 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments