Home ताज्या बातम्या पाण्यावर उभं राहता येईल असा गोठला तलाव! काश्मीरमध्ये थंडीने मोडला 29 वर्षातील...

पाण्यावर उभं राहता येईल असा गोठला तलाव! काश्मीरमध्ये थंडीने मोडला 29 वर्षातील रेकॉर्ड | National


मोठ्या प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यातील लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे श्रीनगर याठिकाणी असणारा डल तलावही गोठला आहे

श्रीनगर, 14 जानेवारी: मोठ्या प्रमाणात झालेल्या बर्फवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यातील लोकांच्या समस्या वाढल्या आहेत. कडाक्याच्या थंडीमुळे श्रीनगर याठिकाणी असणारा डल तलावही गोठला आहे. आज श्रीनगरमधील तापमान उणे 8 अंशांपर्यंत पोहोचले आहे. गेल्या 29 वर्षातील हे तापमान सर्वात कमी तापमान असल्याची माहिती समोर येते आहे. रात्री देखील श्रीनगरमधील तापमान उणे 8.4 होते.

दरम्यान डल लेक गोठल्यानंतरचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यामध्ये आपण पाहू शकतो की या तलावात विहार करणाऱ्या बोटीबाहेर बर्फावर एक मनुष्य उभा आहे. तर ती बोट पुढे नेण्यासाठी चक्क बर्फ फोडावा लागतो आहे. सर्वत्र आच्छादलेला बर्फ हे दृश्य जरी विलोभनीय असलं तरीही श्रीनगरमधील लोकांसाठी हा प्रसंग कठीण आहे. कडाक्याच्या थंडीमुळे आरोग्यविषयक समस्यांना देखील सामोरं जावं लागतं आहे. श्रीनगरने गेल्या 29 वर्षातील सर्वाधिक थंडीची रात्र अनुभवली आहे.

(हे वाचा- रतन टाटांचा आणखी एक PHOTO व्हायरल, कारण वाचून तुम्हीही कराल त्यांच्या साधेपणाला सलाम)

काश्मीर खोऱ्यात इतर ठिकाणीही थंडीच प्रमाण वाढलं आहे. Pahalgam टूरिस्ट रिसॉर्ट हा  अमरनाथ यात्रेसाठीचा दक्षिण काश्मीरमधील बेसकॅम्प आहे. याठिकाणी सर्वात किमान तापमान 11.1 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते तर रात्री याठिकाणी तापमान 11.7 अंश सेल्सिअस झाले होते.


Published by:
Janhavi Bhatkar


First published:
January 14, 2021, 1:54 PM IST

Tags:Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

violence at red fort in delhi: tractor rally violence : लाल किल्ल्यावर झेंडा लावणारा तरुण तरण तारणचा, तीन मुलींसह आई-वडील बेपत्ता – violence at...

भिखविंड (तरण तारण) : दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा ( violence at red fort ) लावणारा जुगराज सिंग हा तरुण...

Recent Comments