Home मुंबई नवी मुंबई पान सेंकड लीड

पान सेंकड लीड


अमेरिकेत मृत्यू तांडव

करोना बळींची संख्या ६७ हजारांवर; सर्वच ५० राज्यांमध्ये संसर्ग

वृत्तसेवा, वॉशिंग्टन

करोनाच्या संसर्गाने अमेरिकेत थैमान घातले आहे. अमेरिकेत मृत्यूचे तांडव सुरू मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. अमेरिकेत मृतांची संख्या ६७ हजारांहून अधिक झाली. मागील २४ तासांमध्ये मिशिगन राज्यात २३२ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या चार हजारांहून अधिक झाली आहे.

अमेरिकेतील सर्वच ५० राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील काही राज्यांनी बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले असल्याची परिस्थिती आहे. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये लॉकडाउनच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. शनिवारी मिशिगन राज्यात मृत्यूंचा दर ९.३ टक्क्यांवर पोहचला होता. तर लॉकडाउनच्या विरोधात बंदुका घेऊन काहींनी आंदोलन केले. या राज्यात २८ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. न्यूयॉर्क राज्यात करोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये ३ लाख १९ हजारजणांना करोनाची बाधा झाली असून २४ हजारांहून अधिकजणांचा करोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर, न्यूजर्सीमध्ये एक लाख २३ हजार जण बाधित असून ७७०० जणांचा मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत ११ लाख ६० हजारांहून अधिकजणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर, एक लाख ७३ हजार करोनाबाधितांनी आजारावर मात केली आहे. करोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेत एक लाखापेक्षा कमी मृत्यू होतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. करोनाबाधितांच्या उपचारासाठी प्रयत्न सुरू असून काही ठिकाणी आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे.

चीनला पुन्हा करोनाचा रुग्ण

बीजिंग : करोना साथीची सुरुवात झालेल्या चीनमध्ये शनिवारी एक करोनाबाधित रुग्ण आढळला, तर दक्षिण कोरियामध्ये शनिवारी सहा नवे रुग्ण आढळले. चीन आणि दक्षिण कोरियाने करोना रोखण्यासाठी लावलेले निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली असून, आर्थिक व्यवहारही सुरू केले आहेत.

चीनने सरसकट निर्बंध उठवले आहेत. मात्र, तापाची तपासणी, तसेच इतर निगराणी सुरू ठेवली जाणार आहे. बीजिंगमधील इंपिरियल पॅलेस अडीच महिन्यांच्या लॉकडाउननंतर शुक्रवारी सुरू करण्यात आला. या ठिकाणी दररोज भेट देणाऱ्यांची संख्या पाच हजारांपर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. तेथे पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

‘डब्ल्यूएचओ’कडून कौतुक

करोना साथ नियंत्रणाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) चीनचे कौतुक केले आहे. चीनमधील वुहान हे साथीचे केंद्र सामान्य जनजीवनापर्यंत कसे आले, यातून इतर देशांनी धडा घ्यावा, असे ‘डब्ल्यूएचओ’ने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटना जीनची जनसंपर्क संस्था असल्याची टीका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर ‘डब्ल्यूएचओ’ने चीनचे कौतुक केले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

housewife health: मला व्यायामाची काय गरज? – archana rairikar article on why do i need exercise?

अर्चना रायरीकरगेल्या काही वर्षांत आपली जीवनशैली वेगळ्या पातळीवर बदलली आहे. करोना पूर्वकाळात असलेली आणि सध्याची, अशा दोन भागांत आपण आपली जीवनशैली विभागू शकतो....

Suraj Mandhare: तलाठ्यांना पुन्हा मिळणार लॅपटॉप – laptops will be distributed to villages talathi says nashik district collector suraj mandhare

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिककंत्राटात निश्चित केलेल्या स्पेसिफिकेशनपेक्षा उच्च दर्जाचे लॅपटॉप असल्यानेच ते तलाठ्यांकडून परत घ्यावे लागल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. हे...

Aurangabad district: मराठवाड्यात १८०० कोटींचे व्यवहार ठप्प – 100 per cent response to strike against gst act condition in aurangabad district

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद'जीएसटी' कायद्यातील जाचक तरतुदींविरोधातील व्यापाऱ्यांच्या 'बंद'ला औरंगाबाद जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. केवळ सरकारला जाग येण्यासाठी 'बंद'चे हत्यार उपसावे लागले....

Recent Comments