Home शहरं कोल्हापूर पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

पालकमंत्र्यांनी घेतला आढावा


म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

ग्रामीण भागातील इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन सेंटरवर प्रमुखपदी मुख्याध्यापक, शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली आहेत. गावात येणाऱ्या प्रत्येकांवर नजर ठेवा, होम क्वारंटाइनमध्ये असलेल्या व्यक्तींच्या घरावर लाल रंगाचे स्टिकर लावण्याची सूचना केली.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोव्हीड केअर, हेल्थ सेंटर, स्वॅब तपासणी, अलगीकरण नियमावली, मनुष्यबळ, सुविधांबाबत बैठक घेऊन आढावा घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, राजर्षी शाहू सरकारी वैद्याकिय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील यांनी सर्व विभागांकडून माहिती घेतली. ते म्हणाले, ‘इन्स्टिट्यूशन क्वारंटाइनमध्ये असलेल्या व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आल्यास त्यांना ग्रामसमितीकडे पाठवा. त्याचबरोबर अलगीकरणाचे नियम तयार करुन ते सर्व खोल्यांमध्ये प्रदर्शित करा. स्वॅबचे नमुने पाठवताना त्यावर मार्करचा, कलर कोडिंगचा वापर करा. लॅबमधील क्षमता वाढविण्याच्यादृष्टीने लागणारे मनुष्यबळ तसेच इतर साहित्य तातडीने पुरवा.’

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, ‘रेड आणि हाय रिस्कमधील स्वॅबच्या नमुन्यासोबत माहितीचा संगणकीय अर्ज हवा. प्रत्येक नमुन्याचा दहा दहाचे गट करुन मार्करने त्यावर नाव लिहा. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनमधील व्यक्तीचा अहवाल निगेटीव्ह आल्यास त्याच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारुन ग्रामसमितीकडे पत्रासोबत पाठवा. पडताळणी करुन त्याचा पुढील निर्णय ग्रामसमिती घेईल. कोव्हीड केअर सेंटर आणि लॅबसाठी आवश्यक असणारे डिप फ्रीजची खरेदी करा.’ तपासणीसाठी येणाऱ्या नमुन्यासाठी झीप लॉकच्या बॅगचा वापर करण्याची सूचना अमन मित्तल यांनी केली. दरम्यान जिल्हाधिकारी देसाई यांनीही आज तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरंसिंगद्वारे संवाद साधून आढावा घेतला. संस्थात्मक अलगीकरण, कोव्हीड केअर सेंटर, कोव्हीड हेल्थ सेंटर, स्वॅब कलेक्शनबाबतचे धोरण, त्याचबरोबर असणारी क्षमता आणि वापरली गेलेली क्षमता याबाबत तालुकानिहाय आढावा त्यांनी घेवूनत्यांनी सूचना केल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना

– इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनच्या ठिकाणी मनुष्यबळ आणि पाण्यासह सुविधा हव्यात

– मुख्याध्यापकांना इन्चार्ज करुन शिक्षकांची इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइनच्या ठिकाणी नेमणूक करा

– बाहेरुन चोरुन येणाऱ्यांवर विशेषतः कर्नाटक सीमा भागात लक्ष ठेवा.

– तहसीलदार, बीडीओ यांनी गावांना भेटी द्याव्या.

– गावांमधील प्रवेशांवर नियंत्रण ठेवा

– ग्राम आणि प्रभाग समित्यांनी सर्व लोकांवर कडक नजर ठेवावी

– होम क्वारंटाइन व्यक्ती असलेल्या घराच्या दारावर रेड स्टिकर लावावेत.

– ग्रामस्थांनी अन्न, औषधे आणि आवश्यक वस्तू वगळता अलग ठेवलेल्या लोकांशी वस्तूंची देवाणघेवाण करू नये.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

dhananjay desai on aurangabad name change: Dhananjay Desai: ‘औरंगाबादचे नाव ‘संभाजीनगर’ करणे म्हणजे शुद्धीकरण!’ – changing aurangabad to sambhajinagar means purification says dhananjay desai

नगर: 'औरंगाबाद' या शहराचे नाव 'संभाजीनगर' करणे गरजेचे आहे. हे नामांतर नसेल तर एकप्रकारे शुद्धीकरण असेल,' असे स्पष्ट मत हिंदू राष्ट्र सेना प्रमुख...

man attempt to burn his wife in aurangabad: विवाहितेला जाळण्याचा प्रयत्न – aurangabad crime news, man attempt to burn his wife after she refuses...

म. टा. प्रतिनिधी, वाळूज महानगरवाळूज जवळील कमळापूर येथे एका विवाहितेला माहेरून कार घेण्यासाठी पाच लाख रुपयाची मागणी करत पतीने मारहाण करून रॉकेल टाकून...

natarajan: विराट कोहलीच्या एका निर्णयामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, टी. नटराजनने केला खुलासा… – had tears in my eyes when virat kohli handed...

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन हा ऑस्ट्रेलियामध्ये फक्त नेट बॉलर म्हणून गेला होता. पण ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये नटराजनने आपले...

Recent Comments