Home ताज्या बातम्या पालघर प्रकरणावर अमित शहांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले... | News

पालघर प्रकरणावर अमित शहांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले… | News


अवघ्या देशाला हादरावून सोडणाऱ्या पालघर हत्याकांडामुळे राजकीय वातावरणही तापायला लागले आहे.

दिल्ली, 20 एप्रिल : अवघ्या देशाला हादरावून सोडणाऱ्या  पालघर हत्याकांडामुळे राजकीय वातावरणही तापायला लागले आहे. या प्रकरणी राज्य सरकारने तातडीने पावलं उचलून 100 जणांना अटक केली आहे. या प्रकरणी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे मुख्यंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून माहिती घेतली आहे.

पालघरमध्ये 2 साधूंची जमावाने दगडाने ठेचून हत्या प्रकरणावरून देशभरात पडसाद उमटत आहे. या घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल  महाराष्ट्र सरकारकडे मागितला आहे.

हेही वाचा – हे डॉक्टर कधीपासून झाले? शिवसेनेनं फडणवीसांना फटकारलं

दरम्यान, पालघर प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही चिंता व्यक्त केली आहे.  पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी 2 साधू, 1 ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिला.

‘या घटनेचे कुणीही राजकारण करू नये’

तर दुसरीकडे, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या मुदद्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘पालघर येथील घडलेली घटना ही अतिशय दुर्देवी असून या घटनेचे कुणीही राजकारण करू नये, असं वक्तव्य राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अकोल्यात पत्रकार परिषदमध्ये केलं.

हेही वाचा –पोलीस इन्स्पेक्टरने मुलांना घातल्या गोळ्या; एकाचा मृत्यू, दोन सुनाही जखमी

पालघरमधील दाभाडी-खानवेल मार्गावर नाशिककडून येणाऱ्या एका वाहनाला ग्रामस्थांनी रोखलं होतं. या प्रवाशांची विचारपूस पूर्ण ऐकून घेण्याच्या आतच ग्रामस्थांनी दगडफेक करायला सुरुवात केली. या मारहाणीमध्ये चालकासह दोन साधूंचा मृत्यू झाला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला होता. संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक केली.

आरोपींना पोलीस कोठडी; तर अल्पवयीन 9 जणांची बालसुधारगृहात रवानगी

दरोडेखोर असल्याच्या संशयावरून गुरुवारी रात्री गडचिंचले येथे तीन जणांची हत्या केल्या प्रकरणी 110 आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी 9 आरोपी 18 वर्षांखलील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठविण्यात आले. तर अन्य 101 आरोपींना शनिवार, 18 एप्रिलला डहाणू कोर्टात हजर करण्यात आले असून त्यांना 30 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर काही आरोपी फरार असून त्यांचा शोध कासा पोलीस करत आहे.

संपादन – सचिन साळवे

Tags:

First Published: Apr 20, 2020 02:06 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

छत्रपती शिवाजी महाराज: मोठ्या पडद्यावर दिसणार छत्रपती शिवाजी महाराजांची शौर्यगाथा, बॉलिवूड अभिनेता पेलणार शिवधनुष्य – chhatrapati shivaji maharaj shahid kapoor may play his role...

हायलाइट्स:अश्विन वर्दे करणार महाराजांच्या आयुष्यावर बायोपिकशाहिद कपूरला करण्यात आली विचारणारितेश देशमुखदेखील करणार महाराजांवर चित्रपटमुंबई- बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरू आहे. अनेक नावाजलेल्या व्यक्तिंच्या...

speaker srs ra3000 launched in india: Sony ने भारतात लाँच केला जबरदस्त वायरलेस स्पीकर, पाहा किंमत – sony’s new smart wireless speaker srs ra3000...

हायलाइट्स:sony SRS RA3000 Wireless Speaker लाँच सोनी इंडियाचा हा स्पीकर प्रीमियम स्पीकर या स्पीकरची किंमत १९ हजार ९९० रुपयेनवी दिल्लीः sony speakers price...

housewife health: मला व्यायामाची काय गरज? – archana rairikar article on why do i need exercise?

अर्चना रायरीकरगेल्या काही वर्षांत आपली जीवनशैली वेगळ्या पातळीवर बदलली आहे. करोना पूर्वकाळात असलेली आणि सध्याची, अशा दोन भागांत आपण आपली जीवनशैली विभागू शकतो....

Recent Comments