Home मनोरंजन पालघर मॉब लिंचिंग : 'नक्की चाललंय तरी काय?' पालघर प्रकरणी भडकलं बॉलिवूड...

पालघर मॉब लिंचिंग : ‘नक्की चाललंय तरी काय?’ पालघर प्रकरणी भडकलं बॉलिवूड – palghar mob lynching farhan akhtar anupam kher to anurag kashyap bollywood celebrities reaction


मुंबई- जगभरातील अनेक देश करोना व्हायरसशी लढण्यासाठी स्वतःच्या घरातच राहत आहेत. पण भारतात स्थिती वेगळी आहे असंच म्हणावं लागेल, कारण देशात लॉकडाउन घोषीत केल्यानंतरही मॉब लिंचिंग सारख्या घटना घडत आहेत. गेल्या आठवड्यात मॉब लिंचिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. तो व्हिडिओ पाहून सर्वसामांन्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सारेच या घटनेचा कडाडून विरोध करत आहेत.

ही तर आता नराधमांची भूमी- सुमीत राघवन

पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली होती. दाभाडी-खानवेल मार्गावरून तीन जण कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप देत, त्यांना दगडाने ठेचून मारले.

बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने याबद्दल नाराजी व्यक्त करत म्हटलं की, ‘पालघरमध्ये झालेल्या हिंसेची मी निंदा करतो. आपल्या समाजात गर्दी म्हणेल तो कायदा असं होता कामा नये आणि मला अपेक्षा आहे की गुन्हेगारांना पकडून लवकर न्याय दिला जाईल.’

ऐश्वर्या- अभिषेकच्या लग्नाचे फोटो पाहिलेत?

अभिनेते अनुपम खेर यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘पालघरमध्ये मॉब लिंचिंगमध्ये मारल्या गेलेल्या तीन साधूंच्या निधनाने मी फार दुःखी आहे आणि घाबरलोही आहे. शेवटपर्यंत हा व्हिडिओ मी पाहू शकलो नाही. हे काय चाललंय? का होतंय? माणुसकीला हा काळीमा आहे.’

म्हणून समीरा रेड्डीने ज्युनिअर एनटीआर सोडलं

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपने या घटनेची निंदा करत म्हटलं की, ‘यात आता हिंदू- मुस्लिम धर्म आणू नका. रिपोर्ट वाचा. जवळपास १०० लोकांना अटक करण्यात आली आहे. मी त्या लोकांची निंदा करतो जे या घटनेस सामील होते. पण याहून जास्त म्हणजे मी या परिस्थितीची निंदा करतो जी आपल्या देशात बनवण्यात आली आहे. ही घटना त्याचाच एक परिणाम आहे.’

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ज्येष्ठ नागरिकास फसविले

म. टा. प्रतिनिधी, मदतीचा बहाणा करून एटीएम कार्डची आदलाबदल करीत भामट्यांनी वृद्धाच्या बँक खात्यातून परस्पर लाख रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे....

फसवा विकास; फसवी मंडळे!

अॅड. विलास पाटणे विशाल द्वैभाषिक मुंबई राज्याच्या निर्मितीनंतर गुजराती भाषिक प्रदेशात गुजराती भाषिक राज्याच्या निर्मितीची मागणी वाढली. पुढेमागे या भाषिक अस्मितेच्या लाटेमुळे ही दोन्ही...

Recent Comments