‘महाराष्ट्रातील पालघरमध्ये जुना आखाडाचे संत स्वामी कल्पवृक्ष गिरी, स्वामी सुशील गिरी आणि त्यांचा चालक निलेश तेलगडे यांच्या हत्या प्रकरणात काल सायंकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. घटनेला जबाबदार असणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, असा आग्रह केला’ असं सोशल मीडियावरून योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय.
पालघर,महाराष्ट्र में हुई जूना अखाड़ा के सन्तों स्वामी कल्पवृक्ष गिरि जी, स्वामी सुशील गिरि जी व उनके ड्राइवर नीलेश… https://t.co/ygYi34zmXG
— Yogi Adityanath (@myogiadityanath) 1587360922000
वाचा :
‘बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या राज्यात हाच फरक’
वाचा :
मॉब लिंचिंगच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाही; आदित्यंचा इशारा
मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
उल्लेखनीय म्हणजे, या घटनेला महाराष्ट्रातही राजकीय पटलावर या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय. या घटनेबद्दल बोलताना, घटनेच्या दिवशीच सर्व आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी केलीय.
पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्ह… https://t.co/1fWG2lBFCx
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) 1587317473000
जमावानं केलेल्या हल्ल्यानंतर जखमी झालेल्या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, इथे तिघांनाही मृत घोषित करण्यात आलं. या प्रकरणात पोलिसांनी ११० जणांना अटक केलीय.
वाचा :
पालघर मॉब लिंचिंग: घटना भयानक आणि लज्जास्पद
जमावाकडून हत्या
तीनही मृत साधू एका अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी कांदिवलीहून दाभाडी-खानवेल मार्गावरून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यासाठी त्यांनी एक गाडीही भाड्यानं घेतली होती. लॉकडाऊन दरम्यान त्यांनी १२० किलोमीटरचं अंतरही कापलं होतं. परंतु, डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावाजवळ वनविभागाच्या एका संतरीनं त्यांना थांबवलं. थोड्याच वेळात इथं जमाव जमा झाला. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र, प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप देत, त्यांना दगडाने ठेचून मारले.
वाचा :
देशातील ३३९ जिल्हे करोनामुक्त, जाणून घ्या तुमच्या भागातील परिस्थिती