करोना- वादग्रस्त वक्तव्यामुळे एजाज खानला अटक
या ट्वीटमध्ये सुमीतने उद्धव ठाकरे, राज्य पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि पालघर पोलीस यांना टॅग केलं आहे. एवढंच नाही तर सुमीतने सलग तीन ट्वीट केले. पहिल्या ट्वीटमध्ये तो म्हणाला की, ‘मी तो व्हिडिओ पाहिला नसता तर बरं झालं असतं. आता ती दृष्य माझ्या डोळ्यासमोरून जात नाहीत. एखाद्या म्हाताऱ्या माणसाची जमाव दगडी मारून हत्या कशी करू शकतं. म्हाताऱ्याचं संरक्षण करण्याऐवजी पोलीस त्यांच्यापासूनच लांब पळत होते. आपण कुठे चाललोय हा प्रश्न आता माझ्या डोक्यात पुढील अनेक वर्ष घोळत राहणार आहे.’
I am numb,I wish I hadn’t seen these videos. I just can’t get the visuals off my mind of an old man been bludgeoned… https://t.co/ul5gh7dTb9
— Sumeet (@sumrag) 1587356541000
How can a mob be so blood thirsty?How come nobody from the crowd intervened and stopped this mad rush of blood. I a… https://t.co/81cPqtOxEi
— Sumeet (@sumrag) 1587356541000
यानंतरच्या ट्वीटमध्ये त्याने लिहिले की, ‘जमाव इतका क्रूर आणि निर्दयी कसा असू शकतो. जमावातील एकानेही हे सर्व थांबवण्याचा प्रयत्न कसा केला नाही… मला वाटतंय की कोणी तरी केलाच असेल.. बरोबर ना? मलला खरंच कळत नाहीये या सगळ्याकडे मी कशापद्धतीने पाहू.. जरा थांबूया.. विचार करूया आणि स्वतःलाच प्रश्न विचारूया.. जे झालं ते योग्य होतं का?
हॉलिवूड- बॉलिवूड आले एकसाथ, नवीन कंपनी तयार
मी सुन्न झालोय.भीषण,भीतिदायक,लाजिरवाणं आहे जे घडलं. “संतांची,वीरांची भूमी” असं टाळूया आपण ह्यापुढे बोलायचं. “नराध… https://t.co/yMWc5u8bIW
— Sumeet (@sumrag) 1587356542000
पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे गुरुवारी १६ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली होती. दाभाडी-खानवेल मार्गावरून तीन जण कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप देत, त्यांना दगडाने ठेचून मारले. या हत्याकांडानं खळबळ उडाली होती.