Home शहरं पुणे पालिकेच्या उत्पन्नाला मोठा फटका

पालिकेच्या उत्पन्नाला मोठा फटकाम. टा. प्रतिनिधी, पुणे

लॉकडाउनचा महापालिकेच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला असून मालमत्ता कराच्या संकलनातून केवळ ३७७ कोटी रुपयांचे उत्पन्न गेल्या दोन महिन्यांत मिळाले आहे. गेल्या वर्षी हाच आकडा ६९९ कोटी रुपयांच्या घरात होता. अशीच अवस्था बांधकाम परवाना विभागाची झाली असून दोन महिन्यांमध्ये या विभागालाही तब्बल ३०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे महापालिकेला अत्यंत कमी प्रमाणात उत्पन्न मिळाल्याचे गेल्या दोन महिन्यांतील आकडेवारीवरून दिसते आहे. राज्य सरकारकडून वस्तू सेवा करापोटी देण्यात येत असलेली रक्कमही अत्यंत कमी आहे. एप्रिल महिन्यात वस्तू सेवा करापोटी केवळ ५० कोटी रुपये महापालिकेला मिळाले आहेत. एरवी हा आकडा १३५ ते १४० कोटी रुपयांच्या घरात असतो. महापालिकेचे उत्पन्न वाढले नाही; तर आगामी काळात शहरातील विकासकामांवर याचा अत्यंत वाईट परिणाम दिसण्याची चिन्हे आहेत.

महापालिकेकडून प्रतिवर्षी पोस्टाद्वारे बिलांचे वाटप करण्यात येते. या वेळी लॉकडाउनमुळे या बिलांचे वाटप झालेले नाही. पुणेकरांनी आतापर्यंत कराच्या एकूण रकमेपैकी ८० टक्के कर ऑनलाइन प्रक्रियेद्वारे भरला आहे. नागरिकांनी यंदाच्या वर्षी महापालिकेला सहकार्य करून अधिकाधिक मालमत्ता कर भरल्यास त्याचा फायदा विकासकामे सुरू करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनानेही कर भरून घेण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न सुरू केले आहेत.

………….

ऑनलाइन मोठा करभरणा

पुणे महापालिकेचे उत्पन्न कमी असले, तरी लॉकडाउनच्या काळात पुणेकरांनी ऑनलाइन मोठ्या प्रमाणात कराचा भरणा केला आहे. त्यामुळे इतर महापालिकांच्या तुलनेत पुण्यात चांगले उत्पन्न जमा झाले. पिंपरी-चिंचवडमध्ये याच काळात ३२ कोटी रुपये जमा झाले; तर बृहन्मुंबई महापालिकेकडे ८८ कोटी रुपये जमा झाले. कल्याण डोंबिवली महापालिकेकडे १५ कोटी रुपयांची करापोटी भर पडली आहे.

……

जून अखेरपर्यंत मुदत

करोनाचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे अनेक नागरिकांना कर भरण्यात अडचणी आल्या. त्यामुळे महापालिकने दंडाविना कर भरण्याची मुदत जून अखेरपर्यंत वाढविली आहे. नागरिक मुदत संपण्याच्या अखेरच्या काळात कर भरण्यासाठी गर्दी करतात, असा अनुभव आहे. मात्र, सध्याच्या काळात अशी गर्दी टाळावी आणि आताच कराचा भरणा करावा, असे महापालिकेचे मालमत्ता कर संकलन प्रमुख विलास कानडे यांनी म्हटले आहे.

….Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येला गंभीर वळण; ठाण्यातील ‘तो’ नगरसेवक कोण? – jameel shaikh death complaint against thane corporator

महेश गायकवाड । ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांचे मारेकरी २४ तासानंतरही सापडलेले नसून मारेकऱ्यांना अटक करण्याचे पोलिसांचे युद्धपातळीवर...

cricket news News : ‘भारताचा कसोटी मालिकेत ४-० असा पराभव होणार’ – india tour of australia 2020 india will lose 4-0 in test series...

नवी दिल्ली: india tour of australia 2020सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ वनडे आणि टी-२० मालिकेनंतर कसोटी मालिका खेळणार आहे. चार सामन्यांच्या कसोटी...

Recent Comments