Home शहरं कोल्हापूर पालेभाज्या महागल्या

पालेभाज्या महागल्याकोल्हापूर टाइम्स टीम

पालेभाज्यांना उन्हाचा तडाखा बसला असून आवक कमी झाल्याने भाज्यांची दरवाढ झाली आहेत. कोथंबिर पेंढीचा दर १५ ते ३० रुपये असून मेथीचा दर १५ ते २० रुपये झाला आहे. फळभाज्यांचे दर आवाक्यात आहेत.

लॉकडाऊनच्या काळात भाज्यांची आवक कायम असून मंडई बंद आहेत. भाजी विक्रेते, मोटारसायकल, हातगाडीवरुन भाज्या विक्री करत असून काही ठिकाणी सुरक्षित अंतर ठेऊन मंडई भरत आहे. लक्ष्मीपुरीतील मंडई बंद करण्यात आली असून दलाल मार्केट, लक्ष्मीपुरी फोड कॉर्नर ते पोलिस ठाणे या मार्गावर सुरक्षित अंतर ठेऊन भाजी विक्री केली जाते. तसेच गंगावेश, पाडळकर मार्केट यार्ड येथील मंडई बंद असून पंचगंगा नदी परिसरात भाजी मंडई भरत आहेत. तसेच प्रत्येक प्रभागात भाजी विक्रेते चौकाचौकात सुरक्षित अंतर ठेऊन भाजी विकत आहेत.

सध्या पालेभाज्यांची आवक कमी झाल्याने दर वाढले आहेत. मेथी पेंढीचा दर १५ ते २० रुपया झाला असून कांदा पात, पोकळा, आंबाडी, पालक, शेपू पेढींचा दर १० रुपये झाला आहे. कोथंबिरीचा दर भडकला असून लहान पेंढीचा दर १५ ते २० रुपये तर मोठ्या पेंढीचा दर २५ ते ३० रुपये आहे. सध्या अनेक घरात चटणी तयार केली जात असल्याने कोथंबिर, आले, लसूणला मागणी वाढली आहे. आले प्रतिकिलो ८० ते १०० रुपये, लसूण १०० ते १५० रुपयाला विकला जात आहे. वांगी, भेंडी, दोडका, ढब्बू मिरची, चवळी शेंग, यांचा दर प्रतिकिलो ४० ते ५० रुपये इतका आहे. गवारीचा दर प्रतिकिलो ८० ते १०० रुपये आहे.

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

वांगी : ४०

टोमॅटो : २०

भेंडी : ४०

ढबू : ४०

गवार : ८० ते १००

दोडका : ४० ते ५०

कारली : ४०

वरणा : ६० ते ८०

हिरवी मिरची : ४०

फ्लॉवर : १५ ते २५ (प्रति गड्डा)

कोबी : १० (प्रति गड्डा)

बटाटा : ३०

लसूण : १०० ते १४०

कांदा : २० ते ४०

आले : ८० ते १००

पडवळ : १५ ते २० (प्रति नग)

मुळा : १२ ते १५ (प्रति नग)

पालेभाजी दर (पेंढी रुपयांत)

मेथी : १५

कांदा पात : १०

कोथिंबीर : १५ ते ३०

पालक : १०

शेपू :१०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपयांत)

सफरंचद : १२० ते १४०

केळी : ३० ते ६० (डझन)

जवारी केळी : २० ते ६० (डझन)

आंबा हापूस : ४०० ते ६०० (डझन)

द्राक्षे : ५०

फोटो अर्जुन टाकळकरSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

nanded govt officers horse latest news: ‘या’ अधिकाऱ्याला घोड्यावरून ऑफिसला यायचंय!; विनंती पत्र झालं व्हायरल – official seeks nod to tie horse on campus...

हायलाइट्स:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याचं पत्र चर्चेत.कार्यालयाच्या आवारात घोडा बांधण्यासाठी मागितली परवानगी.अजब पत्राने जिल्हाधिकारी विपिन इटनकर पडले बुचकळ्यातनांदेड:नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात...

Recent Comments