Home शहरं जळगाव पाहा: ऑनड्युटी एक्साइज अधिकाऱ्याची वाइन शॉपमध्येच बिअरपार्टी!

पाहा: ऑनड्युटी एक्साइज अधिकाऱ्याची वाइन शॉपमध्येच बिअरपार्टी!


प्रवीण चौधरी । :
जळगाव येथील विभागात निरीक्षकपदी कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याचा ‘ऑन ड्युटी’ असताना मद्याचे पेग रिचवत असल्याचा व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा प्रकार नेमका कधी आणि कोठे घडला आहे? याबाबत खात्रीशीर माहिती मिळालेली नाही.

वाचा:

असे ‘ऑन ड्युटी’ मद्यशाळा भरवणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. दहिवडे हे जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागात निरीक्षकपदी कार्यरत आहेत. ते शहरातील एका मद्याच्या दुकानात मद्याचा साठा तसेच इतर बाबींच्या नोंदी रजिस्टरमध्ये घेत असतानाच पित असल्याचे व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहे. स्टॉक रजिस्टरमधून नोंदी घेत असताना त्यांना तेथील कामगार मद्याचे पेग भरून देत आहेत. चखण्यासोबत ते बिअर चा आस्वाद घेत आहेत. हा सारा प्रकार कुणीतरी अज्ञात व्यक्तीने आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात चित्रीत करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. संबंधित व्हिडिओत नरेंद्र दहिवडे हे शासकीय गणवेशात नाहीत. मात्र, ते मद्याचा साठा तपासत असल्याचे तेथे असणाऱ्या काही कागदपत्रांवरून समजते. म्हणजेच, दहिवडे हे ऑन ड्युटी असल्याचे स्पष्ट होत आहे. शनिवारी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या विषयासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

वाचा:

दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागात निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने केलेल्या बेजबाबदार वर्तनाची अद्याप तक्रार करण्यात आलेली नाही. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओची दखल घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी दहिवडे यांच्यावर कारवाई करणार का, हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

jameel shaikh murder: Jameel Shaikh Murder: जमील शेख हत्या: शूटर्सना ‘त्याने’ कारमधून मालेगावात सोडले आणि… – jameel shaikh death shooters went to malegaon in...

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी शाहिद लायक शेख (३१) या आरोपीला...

Recent Comments