Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पोची स्विफ्ट कारला जोरदार धडक, अंगावर काटा आणणारा VIDEO समोर,...

पिंपरी चिंचवडमध्ये टेम्पोची स्विफ्ट कारला जोरदार धडक, अंगावर काटा आणणारा VIDEO समोर, Pimpari chinchwad accident women passed away 1 injured mhasPimpari chinchwad accident women passed away 1 injured mhas | News


भीषण अपघातात जखमी झालेली एक महिला अत्यवस्थ असून अन्य एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पिंपरी चिंचवड, 24 मे : लॉकडाऊन असल्यामुळे वाहतूक बंद आहे आणि रस्ते मोकळे असतील असा समज करून तुम्ही काही निमित्त भरधाव वेगात वाहन चालवून प्रवास करत असाल तर तुमचा घात होऊ शकतो. कारण अशाच भरधाव जाणाऱ्या दोन वाहनांची समोरा-समोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेली एक महिला अत्यवस्थ असून अन्य एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे.

पिंपरी शरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या मुख्य चौकात ही घटना आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. यामध्ये जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून मुंबईकडे जाणाऱ्या स्विफ्ट कार वर समोरून भरधाव वेगात येणारा तीन चाकी टेम्पो धडकला.

प्रत्यक्षदर्शीने सांगितलेल्या माहितीनुसार, हा अपघात एव्हडा भीषण होता की दोन्हीही वाहनांच्या धडकेत रस्त्याच्या बाजूला असलेले संरक्षक कठडे तुटले तर अपघातग्रस्त वाहनातील दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत.

लॉकडाऊनच्या मागील 65 दिवसातील रस्त्यावर झालेला हा शहरातील पहिलाच गंभीर अपघात आहे.

संपादन – अक्षय शितोळे

First Published: May 24, 2020 07:04 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

violence at red fort in delhi: tractor rally violence : लाल किल्ल्यावर झेंडा लावणारा तरुण तरण तारणचा, तीन मुलींसह आई-वडील बेपत्ता – violence at...

भिखविंड (तरण तारण) : दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर परेड दरम्यान लाल किल्ल्यावर झेंडा ( violence at red fort ) लावणारा जुगराज सिंग हा तरुण...

Recent Comments