Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड पालिकेचा मोठा निर्णय, हॉटस्पॉट भागावर असणार ड्रोनची नजर Pimpri Chinchwad...

पिंपरी चिंचवड पालिकेचा मोठा निर्णय, हॉटस्पॉट भागावर असणार ड्रोनची नजर Pimpri Chinchwad Municipal Corporations decision drone spot on hotspot area mhss | News


त्याचबरोबर पुढील 3 दिवसांसाठी शहरातील मुख्य बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

 पिंपरी चिंचवड, 26 जून : पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पिंपरी चिंचवडमध्येही रुग्णांची संख्या वाढली असून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यापुढे शहरातील हॉटस्पॉटवर ड्रोनने नजर ठेवली जाणार आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील हॉटस्पॉटवर आता ड्रोनद्वारे नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शहरातील इतर सार्वजनिक ठिकाणीही ड्रोन फिरणार असून लोकांवर नजर ठेवली जाणार आहे, असं पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

नागरिक नियमांचं पालन करत नसल्याचे आढळून आल्यास तो परिसर तीन दिवसांसाठी सील केला जाणार असल्याचंही श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.

आनंद नांगर, दापोडी, नेहरू नगर ,भाटनगर ,बौद्ध नगर,रमाई नगर, साईबाबा नगर,दिघी हे परिसर हॉटस्पॉट असल्याने इथे अधिक सतर्कता बाळगून ड्रोन द्वारे नजर ठेवली जाणार आहे. त्याच बरोबर पोलिसांचा अधिकचा बंदोबस्तही तैनात केला जाणार असल्याचं हर्डीकर यांनी सांगितलं.

कोरोना काळात नोकरी गेली, तरी झाला नाही हताश, इंजिनीअरनं सुरू केलं इडली सेंटर

दरम्यान, अनलॉक-1 ची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर सर्वच शहरांमधील लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात आहे. यामुळे नागरिकांना बाहेर पडणं शक्य होतं आहे. मात्र त्याचवेळी आता पुणे, पिंपरी-चिंचवड या भागातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

वारंवार सांगूनही बाजारपेठेमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि सम विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचं पालन होत नसल्याने आता अखेर पुढील 3 दिवसांसाठी शहरातील मुख्य बाजारपेठ पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकारी आणि सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी याबाबतचा आदेश काढला आहे.

संपादन – सचिन साळवे

First Published: Jun 26, 2020 01:31 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ramdas Athawale Corona Positive: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंना करोनाची लागण; कार्यकर्त्यांना दिल्या ‘या’ सूचना – Union Minister Ramdas Athawale Tests Covid Positive

मुंबईः अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचाही करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे....

Hathras Gang Rape Case: हाथरस प्रकरण: अलाहाबाद हायकोर्ट CBI तपासावर देखरेख करणार; सुप्रीम कोर्टाचा निर्णय – Hathras Gang Rape And Murder Case Allahabad High...

नवी दिल्ली: हाथरस प्रकरणाबाबत (Hathras gangrape and murder case) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आज महत्वाचा निर्णय दिला. या प्रकरणाचा सीबीआय (CBI) करत असलेला...

Sewri TB hospital: साठ जणांचे जबाब नोंदवले – statement of 60 people from sewri tb hospital have been recorded by mumbai municipality administration committee

‌म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईशौचालयामध्ये पडलेला मृतदेह सफाई कर्मचाऱ्यांना दिसला कसा नाही? कोणत्याही मृतदेहाची दोन दिवसानंतर असह्य दुर्गंधी येते, या मृतदेहाची दुर्गंधी आली...

Recent Comments