Home मनोरंजन पिस्ता धाकड: Bigg Boss 14 ची टॅलेन्ट मॅनेजर पिस्ता धाकडचा अपघाती मृत्यू,...

पिस्ता धाकड: Bigg Boss 14 ची टॅलेन्ट मॅनेजर पिस्ता धाकडचा अपघाती मृत्यू, सेटच्या बाहेरच झाला मोठा अपघात – bigg boss 14 talent manager pista dhakad demise


मुंबई-शुक्रवारी, १५ जानेवारीला ‘बिग बॉस १४’ च्या सेटच्या बाहेर एक दुर्घटना घडली. यात शोची टॅलेन्ट मॅनेजर पिस्ता धाकडचा अपघाती मृत्यू झाला. पिस्ता २३ वर्षांची होती. तिच्या मृत्यूमुळे बिग बॉसच्या संपूर्ण टीमला मोठा धक्का बसला आहे.पिस्ता धाकड ‘बिग बॉस’ शोची निर्मिती करणाऱ्या एंडेमोल शाईन इंडिया कंपनीचा भाग होती.

पिस्ता धाकडच्या अकाली मृत्यूमुळे काम्या पंजाबी, हिमांशी खुराना, युविका चौधरी या साऱ्यांनाच धक्का बसला आहे. हे सर्व सेलिब्रिटी पिस्ताला जवळून ओळखत होते आणि ते सारेच बिग बॉसच्या आधीच्या पर्वाचे स्पर्धकही होते. बिग बॉस १३ मध्ये स्पर्धक म्हणून दिसलेल्या हिमांशीने पिस्ताचा सलमानसोबतचा फोटो शेअर करत ‘RIP पिस्ता. तिच्या निधनाबद्दल कळलं. अजूनही मी शॉकमध्ये आहे. आयुष्याबद्दल खरंच काही सांगता येत नाही.’ असं कॅप्शन लिहिलं.


काम्या पंजाबीने इन्स्टाग्रामवर पिस्ताचा सेल्फी शेअर केला आणि लिहिले की, ‘ही पिस्ता धाकड आहे, फक्त २३ वर्षांची. गेल्या काही वर्षांपासून ती बिग बॉसच्या टीमचा भाग होती. ती अतिशय हुशार होती. पण काल रात्री ती आम्हा साऱ्यांना सोडून गेली. देव तुझ्या आत्म्यास शांती देवो.’


युविका चौधरीने पिस्तासोबतचा जुना व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करत तिच्या जाण्याचं दुःख व्यक्त करत लिहिलं की ‘तू इतक्या लवकर आम्हाला सोडून का गेलीस? माझा यावर अजूनही विश्वास बसत नाहीए.’


‘वीकेण्ड का वार’ च्या शूटनंतर घरी जात होती पिस्ता, वॅनिटी वॅननेच दिली टक्कर

एका इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, पिस्ता धाकड शुक्रवारी ‘बिग बॉस १४’ च्या ‘वीकेण्ड का वार’ एपिसोडचं शूट संपवून आपल्या एका सहकार्यासोबत स्कूटीवरून परतत होती. रस्त्यात अंधार असल्यामुळे त्यांची गाडी घसरली गेली आणि खड्ड्यात गेली. स्कूटीवरून दोघंही पडले. तेवढ्यात मागून येणारी व्हॅनिटी व्हॅन पिस्ता वरूनच गेली. या अपघातात पिस्ताचा जागीच मृत्यू झाला. पिस्ता धाकडने ‘बिग बॉस’ शिवाय ‘खतरों के खिलाडी’ मध्येही काम केलं होतं आणि ती कंपनीच्या सर्वोच्च कर्मचार्‍यांपैकी एक होती.

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Sitaram Kunte: अनुभवी आणि विश्वासार्ह : सीताराम कुंटे – sitaram kunte new chief secretary of maharashtra

अखेर सीताराम कुंटे राज्याचे मुख्य सचिव झाले. खरेतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच ते मुख्य सचिवपदी येणार असा अनेकांचा कयास होता.  Source...

Corona Rules Violation: करोनाबाधित नियमांचा भंग करून फिरत होता घराबाहेर; गुन्हा दाखल – police file fir against corona positive man for corona rules violation

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईकरोनास रोखण्यासाठी मुंबईत लागू केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गोवंडी पोलिस ठाण्यापाठोपाठ सोमवारी चेंबूर पोलिस ठाण्यात...

Recent Comments