Home शहरं पुणे पुणेकरांना दिलासा

पुणेकरांना दिलासा१८ जण करोनामुक्त; दिवसभरात मृत्यू नाही

म. टा. प्रतिनिधी, पुणे

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून करोना विषाणूमुळे दररोज रुग्ण दगावत असल्यामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक स्थितीतून रविवारी काहीसा दिलासा मिळाला. रविवारी दिवसभरात शहर, पिंपरी चिंचवड; तसेच जिल्ह्यात एकही करोनाबाधित रुग्ण दगावला नाही. तसेच, अठरा जणांनी करोना विषाणूवर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पुणेकरांना हा दिलासा असला, तरी शहर व जिल्ह्यात रविवारी दिवसभरात ५७ जणांना नव्याने लागण झाल्याने चिंतेचे ढग अद्याप कायम आहेत.

पुणे शहर व जिल्ह्यात आजपर्यंत ५४ जण करोनाने दगावले आहेत. शहरात ३० मार्चला करोनामुळे पहिला बळी गेल्यानंतर दररोज २-३, तर कधी दहा-बारा जण दिवसभरात मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या आठवड्यात दररोज सरासरी चार ते पाच जणांचा मृत्यू होत असल्याने चिंता वाढली होती. रविवारी संपूर्ण दिवसात करोनामुळे एकही रुग्ण दगावला नसल्याने दिलासा मिळाला आहे. तसेच, दिवसभरात १८ जण करोनामुक्त झाले आहेत. असे असले, तरी शहर व जिल्ह्यात दिवसभरात करोनाची ५७ जणांना नव्याने लागण झाली असून एकूण रुग्णांची संख्या ६६९ पर्यंत पोहोचली आहे. पुणे शहरात ४५ जणांना नव्याने करोनाची बाधा झाली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये पाच, तर जिल्ह्यातही रुग्ण आढळले आहेत.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments