Home शहरं पुणे पुणे गुन्हेगारी: दुचाकी गाडी न हलवल्याने तीन भावांनी केला कोयत्याने वार -...

पुणे गुन्हेगारी: दुचाकी गाडी न हलवल्याने तीन भावांनी केला कोयत्याने वार – crime in pune three brother attack unknown boy on fighting


म. टा. प्रतिनिधी, पुणे

दुचाकी बाजूला न घेतल्याच्या रागातून तिघा भावांनी तरुणावर कोयत्याने वार केले. मार्केट यार्ड परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

अल्ताफ रफिक शेख (वय २०), कमरुद्दीन रफिक शेख (वय २२) आणि वसिम रफिक शेख (वय २४, रा. आंबेडकरनगर, मार्केट यार्ड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत विशाल जाधव (वय २१, रा. मार्केट यार्ड) यांनी मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रात्री पावणेदहाच्या सुमारास विशाल आणि त्याचा मित्र सतीश कसबे गप्पा मारत होते.

त्यावेळी तेथे आलेल्या अल्ताफने विशालला दुचाकी बाजूला घ्यायला सांगितली. त्यावर, ‘तुला जाण्यासाठी रस्ता मोकळा आहे. तू तेथून जाऊ शकतोस,’ असे उत्तर विशालने अल्ताफला दिले. याचा राग मनामध्ये ठेवून अल्ताफ घरी निघून गेला. काही वेळानंतर अल्ताफच्या दोन भावडांना घेऊन त्या ठिकाणी आला. या तिघांनी विशालला शिवीगाळ करून त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्याला जखमी केले. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक पी. ए. खटके करीत आहेत.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Ambernath-Karjat Railway Services: Local Train Latest News: रूळ दुरुस्ती करणारे मशिन घसरले; एक ठार, तीन कामगार जखमी – central railway service disrupted between ambernath...

ठाणे: रेल्वे रूळ दुरुस्त करणारी मशिन रुळावरून घसरून झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर तिघे जखमी झाले आहेत. या अपघातानंतर मध्य...

Sharad Pawar Warns Modi Government After Violence In Delhi – Delhi Violence: ‘पंजाबला पुन्हा अशांत करण्याचं पातक मोदी सरकारनं करू नये’ | Maharashtra Times

मुंबई: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चादरम्यान राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'बळाचा वापर करून आंदोलन चिरडलं तर...

fake websites: आधार कार्ड, वोटर कार्ड आणि पॅन कार्डच्या ‘या’ वेबसाइट्पासून सावध राहा, पाहा संपूर्ण यादी – fake websites: aadhaar voter and pan card...

नवी दिल्लीः कोणत्याही गोष्टी प्रसिद्ध झाल्या की, त्याच्या नावावर फसवणूक करण्याचे प्रकार सुरू होतात. भारतात आधार कार्ड खूपच आवश्यक बनले आहे. आधार कार्डच्या...

Recent Comments