Home शहरं पुणे पुणे बातमी: 'त्यांनी वारंवार बलात्कार केला', महिलेला महागात पडली खोटी फिर्याद -...

पुणे बातमी: ‘त्यांनी वारंवार बलात्कार केला’, महिलेला महागात पडली खोटी फिर्याद – false complaint slaps woman


म. टा. वृत्तसेवा, भवानीनगर

पतीने आरोपीकडून घेतलेल्या हातउसन्या पैशांसाठी आरोपीने संबंधित व्यक्तीच्या पत्नीकडे वारंवार तगादा लावला होता. त्या बदल्यात आपल्याकडून शारीरिक संबंधाची सातत्याने मागणी केली. पैसे न दिल्याने आरोपीने वारंवार बलात्कार केला आणि ७ जून २०२० रोजीही पती घरी नसताना बलात्कार केला, अशी फिर्याद इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिस ठाण्यात एका विवाहित महिलेने दिली होती. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला व तपास सुरू केला.

तपासादरम्यान या महिलेने पुन्हा दुसरा जबाब देऊन, आरोपीने बलात्कार केला नसून, फक्त पैशाचा तगादा लावल्याने गुन्हा दाखल केल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. या दरम्यान संशयित आरोपीने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

सरकारी वकील अॅड. प्रसन्न जोशी यांनी न्यायाधीश आर. आर. राठी यांच्यासमोर युक्तिवाद करताना संबंधित प्रतिज्ञापत्राचा मुद्दा मांडला व त्यातील विसंगती न्यायालयाच्या नजरेस आणून दिली. पोलिस व न्याय यंत्रणेचा वेळ विनाकारण खर्ची घातल्याबद्दल फिर्यादीवर कारवाईची मागणी केली.

न्यायालयाची चपराक

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून, न्यायाधीशांनी ‘फिर्याद खोटी असून, न्यायालय, पोलिस यंत्रणेचा वेळ घालविल्याचे व आरोपीस विनाकारण न्यायासाठी झगडावे लागले,’ असे निरीक्षण नोंदवले. वालचंदनगर पोलिस ठाण्यास फिर्यादीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.



Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

punjab government: पंजाबचे बंड – punjab state government challenge central government over farm laws

केंद्र सरकारच्या शेतीविषयक तीन नव्या कायद्यांना रस्त्यावर होत असलेला विरोध आता विधिमंडळापर्यंत पोहोचला असून, पंजाबमधूनच त्याची सुरुवात झाली आहे. पंजाब विधानसभेने केंद्राच्या तिन्ही...

Eknath Khadse: खडसेंसाठी राष्ट्रवादीच्या एकाचे मंत्रिपद जाणार – one ncp minister will has resign from his post for eknath khadse

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शुक्रवारी प्रवेश करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यायला लावला जाणार असल्याच्या बातम्याही चर्चिल्या...

BSNL festive offer: BSNL युजर्ससाठी फेस्टिव सीजनमध्ये ऑफर्स, या रिचार्जवर बंपर फायदे – festive offer: bsnl extends validity of rs 1999, rs 699, rs...

नवी दिल्लीः बीएसएनएल कंपनीने फेस्टिवल सीजनमध्ये आपल्या ग्राहकांना बंपर ऑफर देत आहे. बीएसएनएल मध्ये अनेक प्रिपेड व्हाऊचर्स (PVs) आणि स्पेशल टॅरिफ व्हाउचर्स (STVs)...

Recent Comments