Home ताज्या बातम्या पुण्यात आज 6 मृत्यू; यापुढे 69 Micro Containment Zone मध्येच निर्बंध कडक...

पुण्यात आज 6 मृत्यू; यापुढे 69 Micro Containment Zone मध्येच निर्बंध कडक micro containment zone in Pune lockdown sealed area only 3 percent in 69 microcontainment | Pune


वाढत्या कोरोनारुग्णांचं प्रमाण बघता प्रशासनानं काही नियमात बदल केले आहेत. 69 Micro containment Zones मध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत. तर उर्वरित ठिकाणी पुणेकरांना थोडा मोकळा श्वास घ्यायला परवानगी देण्यात येणार आहे.

पुणे, 4 मे : पुण्यात आज  दिवसभरात 61 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आणि 6 करोनाबाधितांचा मृत्यू झाला.  एकीकडे कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाने सोमवारपासून लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात बदलले आहेत. त्यानुसार पुण्यात आता निरीक्षणात आलेल्या  69  Micro containment Zones मध्ये निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत. तर उर्वरित ठिकाणी पुणेकरांना थोडा मोकळा श्वास घ्यायला परवानगी देण्यात येणार आहे.

पुण्यात आज करोनाचा संसर्ग झालेले 50 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये एकूण 106 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात एकूण 76  रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 1978 पर्यंत पोहोचली आहे. कोरोनाबळींची संख्याही शहरात मोठी आहे. आतापर्यंत या विषाणूने 107 लोकांचा जीव घेतला आहे. पुण्यात एकीकडे कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना आता या मायक्रोकंटेन्मेंट झोन म्हणजे छोट्या प्रतिबंधित क्षेत्रात (Micro containment zone in pune) निर्बंध कडक होणार आहेत.

रेड झोन (Red Zone) आणि प्रतिबंधित क्षेत्र (Containment Zone) हे शब्द आता रोजच्या सवयीचे झाले आहेत. पण पुण्यात आता याहून अधिक नेमकी विभागणी करण्याचा निर्णय प्रशासनाने रविवारीच घेतला. आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

69 कंटेन्मेंट झोन कुठले?

मध्यवर्ती पुण्यातल्या सर्व पेठा (नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ वगळून), पर्वती दर्शन नीलायम, दांडेकर पूल,  तळजाई वस्ती, शिवदर्शन, दांडेकर पूल, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, काकडे वस्ती, मीठानगर, कोंढवा, कात्रज, सुखसागरनगर, बालाजीनगर, धनकवडी- गुलाबनगर, अप्पर इंदिरानगर, प्रेमनगर,  कामगार पुतळा, पाटील इस्टेट, शिवाजीनगर -म. गांधी झोपडपट्टी, येरवडा ताडीगुत्ता, जयप्रकाशनगर, गांधीनग ,नागपूर चाळ, फुलेनगर- येरवडा, धानोरी-कळस, वैदूवाडी, गोसावीवस्ती, सय्यदनगर, गुलामअलीनगर, सातववाडी, माळवाडी, हांडेवाडी, वेताळनगर, हडपसर- आदर्श कॉलनी, मीनाताई ठाकरे नगर, कोथरूड – शिवतारा सोसायटी, चंद्रगुप्त सोसायटी, ताडीवाला रस्ता, वडगाव शेरी, गणेशनगर, गुलटेकडी, डायस प्लॉट

अन्य बातम्या

परदेशात अडकलेले भारतीय लवकरच पोहोचणार मायदेशी, केंद्र सरकारकडून नियमावली जाहीर

Fact Check: सरकार बेरोजगारांना प्रत्येक महिन्यात देणार 3500 रुपये? खरं की खोटं

First Published: May 4, 2020 10:47 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments