Home शहरं पुणे पुण्यात करोना रुग्ण: अनलॉकनंतर पुण्यात जूनमध्ये दुपटीने वाढले करोना रुग्ण - pune...

पुण्यात करोना रुग्ण: अनलॉकनंतर पुण्यात जूनमध्ये दुपटीने वाढले करोना रुग्ण – pune has the highest increase rate of corona patients in june


म. टा. प्रतिनिधी, पुणे

गेल्या काही दिवसांत कोव्हिड-१९च्या संसर्गात वेगाने वाढ झाल्याने जूनमध्ये पुणे शहरात १० हजारांहून अधिक करोना रुग्णांची वाढ झाली. लॉकडाउन शिथिल व्हायला लागल्यावर जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. जूनमध्येच साडेसहा हजार रुग्ण करोनातून मुक्त झाले असले, तरी सक्रिय रुग्णसंख्या आणि करोनाने झालेले मृत्यू दुपटीने वाढल्याने जुलैमध्ये ही साथ नियंत्रणात ठेवण्यासाठी पालिकेप्रमाणे नागरिकांना दक्षता घ्यावी लागणार आहे.

शहरात मार्चच्या सुरुवातीला करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. जूनमध्ये लॉकडाउनची बंधने शिथिल करून ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत अनेक व्यवहार सुरू करण्यात आले. त्याचा परिणाम रुग्णसंख्येवर दिसून येत आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात शहरात सव्वातीन हजार रुग्ण वाढले होते; पण १६ ते ३० जून या कालावधीत करोनाबाधितांची संख्या सव्वा सात हजारांनी वाढली.

शहरातील दैनंदिन रुग्णवाढच पाचशे-सहाशेच्या पुढे गेल्याने रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अडीच ते तीन हजारांच्या दरम्यानचा सक्रिय रुग्णसंख्येचा आकडाही थेट सहा हजारांवर पोहोचल्याने पालिकेसमोर जुलैमध्ये ही रुग्णवाढ नियंत्रणात ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

करोना रुग्णसंख्या

१ जून : ६ हजार ५२९

१५ जून : ९ हजार ८९०

३० जून : १७ हजार २२८

जून महिन्यातील एकूण रुग्णवाढ : १० हजार ६९९

करोनामुक्त रुग्ण

१ जून : ३ हजार ९५०

१५ जून : ६ हजार ४४६

३० जून : १० हजार ४५१

जूनमधील एकूण करोनामुक्त : ६ हजार ५०१

सक्रिय रुग्णसंख्या

१ जून : २ हजार २५९

१५ जून : २ हजार ९८६

३० जून : ६ हजार १३४

सक्रिय रुग्णसंख्येतील वाढ : ३ हजार ८७५

करोना मृत्यू

१ जून : ३२०

१५ जून : ४५८

३० जून : ६४३

जूनमधील एकूण मृत्यू : ३२३

पिंपरीतही मोठी वाढ

पिंपरी-चिंचवडमध्ये एक ते ३० जूनच्या कालावधीत करोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत दोन हजार ६८८ इतकी भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या तीन हजार २७३ असून, त्यापैकी एक हजार ९९८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

शहरात अकरा मार्च रोजी करोनाचे पहिले तीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर तीस मार्चपर्यंत ही संख्या बारावर पोहचली. एक एप्रिल ते ३० एप्रिलच्या कालावधीत रुग्णसंख्या १०४ ने वाढून ११६ झाली. एक मे ते ३१ मे या कालावधीत ४५० रुग्णसंख्या वाढली आणि एकूण रुग्णसंख्या ५६६ झाली. जूनला प्रारंभ होईपर्यंत रुग्णसंख्येत सरासरी आठ-दहाने वाढ होत होती. जूनमध्ये मात्र रुग्णवाढीचा आलेख उंचावत गेला. गेल्या दहा दिवसांमध्ये तर सरासरी शंभरहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

सद्यःस्थितीत शहरात सक्रिय रुग्णांची संख्या एक हजार २२८ असून, आजपर्यंत ४७ मृत झाले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. चाचण्यांमध्ये वाढ झाल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ दिसून येत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Bihar election: संयमाची लस टोचा – editorial on bihar election 2020 and bjp promises free covid vaccine to people

विधानसभेच्या निवडणुका होत असलेल्या बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात सर्वांना करोनाची मोफत लस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन, सगळी नैतिकता खुंटीला...

nashik vegetable market: भाजीबाजाराचे लिलाव पुन्हा स्थगित – auction of vegetable market postponed again in nashik

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवरजवळ नव्याने तयार करण्यात आलेल्या भाजी मार्केटमधील १४५ विक्रेत्यांना ओटे वाटपासाठी २२ ऑक्टोबर रोजी चिठ्ठी...

Recent Comments