Home ताज्या बातम्या पुण्यात दारू विक्रीबद्दल मोठी बातमी, प्रशासनाने केली महत्त्वाची घोषणा | News

पुण्यात दारू विक्रीबद्दल मोठी बातमी, प्रशासनाने केली महत्त्वाची घोषणा | News


एकीकडे राज्य सरकारने मद्यविक्रीबाबत असा निर्णय घेतलेला असताना पुणे शहरात मात्र मद्यविक्री परवानगीबाबतचा संभ्रम कायम होता.

पुणे, 04 मे : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  लॉकडाउनचा तिसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे. या तिसऱ्या टप्प्यात काही अटी शिथील करण्यात आल्या आहे. पुण्यात दारू विक्रीवरून बराच घोळ निर्माण झाला होता. अखेर, या वादावर आता पडदा पडला आहे.

एकीकडे राज्य सरकारने मद्यविक्रीबाबत असा निर्णय घेतलेला असताना पुणे शहरात मात्र मद्यविक्री परवानगीबाबतचा संभ्रम  कायम होता. कारण, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी अद्याप कोणतेही आदेश काढलेले नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनीच अद्याप आदेश दिले नसल्याने दारूची दुकानं उघडता येणार नाही की नाही, याबाबतचा संभ्रम निर्माण झाला होता. अखेर शहरात दारू विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पुण्यात दारू विक्रीला अखेर परवानगी देण्यात आली आहे. पुण्यातील कंटेटमेंट झोन वगळून मद्यविक्रीला परवानगी देण्यात आली आहे.  वाईन शॉप्स, बीअर शॉपी चालू होणार आहे. पण सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून सशर्त परवानगी देण्यात आली आहे. परंतु, शहरात रेस्टॉरंट, बार माञ बंदच राहणार आहे, असा आदेश जिल्ह्याधिऱ्यांनी काढला आहे.

हेही वाचा –असं काय घडलं की फक्त 20 मिनिटात वाईन शॉप बंद करावं लागलं, पाहा VIDEO

आजपासून पुणे शहरातील कंटेटमेंट झोनमध्ये 91 चौरस किमी फुटावरून 10 किमी चौरस फुटावर आणला आहे. म्हणजेच आता पुणे शहराचं फक्त 10 टक्के क्षेञफळ कोरोना प्रतिबंधित म्हणून सीलबंद राहणार आहे. उर्वरित 90 टक्के शहरातील लॉकडाउन निर्बंध आजपासून शिथिल केले आहे. प्रत्येक गल्लीतील पाच दुकानं उघडी ठेवता येतील. पण पुणेकरांना सोशल डिस्टंटसिंग पाळावं लागेल.

यापुढे पुणेकरांना कोरोना जीवनशैली अंगीकारावीच लागणार आहे. जेणेकरून लॉकडाउन टाळता येईल. त्यासाठी पुणेकरांनी मास्क वापरणे बंधनकारक असून सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतर ठेवावे जेणेकरून कोरोनाचा फैलाव होणार नाही, असं आवाहन पुणे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पञकार परिषद घेऊन  केलं.

हेही वाचा –नागपुरात दारू विक्री सुरू होणार की नाही? तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केली भूमिका

तसंच, शहरात पोलिसांना बँरेकिटिंग कमी करण्याच्या सूचना दिल्यात आहे. पण असं असलं तरी रिक्षा आणि पब्लिक ट्रान्सपोर्टला परवानगी नाही. शहरातील ज्या आयटी कंपन्या आहे त्यांनी वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्यावं. आणि मोलकरीन अर्थात मेट सर्विसला परवानगी देण्यात आली आहे. शहरातील मंदिरं उघडू शकता, पण गर्दी टाळण्यासाठी सार्वजनिक प्रार्थनेला परवानगी देण्यात आलेली नाही, असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, पुणे महानगर पालिकेने शहरात एकूण 69 प्रतिबंधित क्षेत्र घोषित केले आहेत. शहरातील प्रतिबंधित क्षेत्र आणि विनाप्रतिबंधित क्षेत्राबाबत मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी नवे आदेश काढले आहेत. नव्या आदेशानुसार पुण्यातील जाहीर करण्यात आलेल्या 69 प्रतिबंधित क्षेत्रातील निर्बंध यापुढेही कायम राहतील. प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर ठिकाणी शासन निर्णयानुसार सवलती मिळणार आहेत.

 

संपादन – सचिन साळवे

First Published: May 4, 2020 01:45 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

THE NEW JIOPHONE 2021 OFFER: Reliance Jio चा नवा धमाका, ७४९ रुपयांत वर्षभर अनलिमिटेड कॉल आणि डेटा – jiophone 2021 offer announced with 2...

हायलाइट्स:रिलायन्स जिओची जबरदस्त ऑफर १ मार्च २०२१ पासून या ऑफरला सुरुवात होणार THE NEW JIOPHONE 2021 OFFER असे नाव नवीन आणि जुन्या ग्राहकांना...

Kangana Ranaut: कंगनाला २२ मार्चपर्यंत अटक करू नका; हायकोर्टाचे निर्देश – kangana ranout and rangoli chandel maintained interim protection from arrest

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईअभिनेत्री कंगना रणौट व तिची बहीण रंगोली चंडेल यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी नोंदवलेल्या देशद्रोहाच्या गुन्ह्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी...

Recent Comments