Home ताज्या बातम्या पुण्यात परवानगी मिळाल्यानंतरही सलून उघडली जाणार नाहीत, 'हे' आहे कारण, Salons will...

पुण्यात परवानगी मिळाल्यानंतरही सलून उघडली जाणार नाहीत, ‘हे’ आहे कारण, Salons will not be opened in Pune even after getting permission updates mhas | Pune


याबाबत महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष आणि नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी माहिती दिली आहे.

पुणे, 27 जून : पुणे शहरात अनलॉकच्या प्रक्रियेत काही नियम आणखी शिथिल करण्यात आले आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सलून आणि ब्युटीपार्लर सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र तरीही सलून व्यावसायिक सलून दुकाने उघडणार नाहीत. याबाबत महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष आणि नाभिक समाज नेते सोमनाथ काशिद यांनी माहिती दिली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तसेच महत्त्वाच्या मागण्या मान्य न झाल्याने आणि फक्त हेअर कटिंगचा निर्णय न पटल्यामुळे सलून न उघडण्याचा निर्णय घेतला असं सोमनाथ काशिद आणि इतर सलून व्यवसायिकांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे सलून उघडण्यासाठी आता आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

सलूनमध्ये अपॉईंटमेंट घेऊनच ग्राहकांना सेवा देणं बंधनकारक आहे. सलूनमध्ये फक्त कटिंग तर ब्युटीपार्लरमध्ये केस कटिंग करण्यास मूभा असेल. कलरिंग व्हॅक्सिंग आणि आयब्रो थ्रेडिंगला परवानगी आहे. मात्र, स्किन ट्रिटमेंटला परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे सलून आणि ब्युटीपार्लर चालवताना ग्राहक आणि सेवक दोघांनाही मास्क वापरणं बंधनकारक असल्याचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटलं होतं.

काय आहेत सलून व्यवसायिकांच्या मागण्या?

1) आत्महत्याग्रस्त सलून व्यावसायिकांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची त्वरीत अर्थिक मदत द्यावी

2) सलून व्यावसायिकांना प्रत्येकी एक लाख रूपये त्वरीत अर्थिक मदत देण्यात यावी

3) सरकारने अर्थिक मदत अजून जाहीर केली नाही त्याच बरोबर गेली चार महिन्यांचे दुकान भाडे व लाईट बिल माफ करण्यात आले नाही त्यामुळे सलून व्यावसायिक सरकारवर नाराज आहेत

4) केशकला बोर्ड कार्यान्वित करून अध्यक्ष निवड करावी व अर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा

5) ज्या ठिकाणी सलून सुरू होतील त्या ठिकाणी 50% ते 60% वाढीव दर घेऊन सलून सुरू करण्यात येणार आहेत

6) जिल्हा अधिकारी यांचा GR सलून व्यावसायिकांन पर्यंत न पोचवल्याने सलून कोणत्या अटी व शर्तींवर सुरू करायचे असे सलून व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे

7) मुख्यमंत्री साहेबांनी अजूनही सलून व पार्लर असोसिएशन च्या शिष्टमंडळास भेटण्यासाठी वेळ दिला नाही आमचे म्हणणे जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी वेळ द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र सलून व पार्लर असोसिएशन चे अध्यक्ष सोमनाथ काशिद व सलून व्यावसायिक यांनी केली आहे.

संपादन – अक्षय शितोळे

First Published: Jun 27, 2020 11:21 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

cyclone nivar: निवार तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक, मुसळधार पाऊस सुरू – cyclone nivar weakens, but heavy rain in chennai, puducherry

चेन्नई :निवार चक्रीवादळ गुरुवारी पहाटे अंधारातच तमिळनाडू, पुद्दुच्चेरीला धडक देत पुढे निघून गेलंय. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा धोका आता कमी...

Coronavirus in Malegaon: गाफील राहू नका – nashik collector suraj mandhare has appealed follow rules and regulations to malegaon people over coronavirus

म. टा. वृत्तसेवा, मालेगावकरोनाच्या पहिल्या लाटेत मालेगाव हॉटस्पॉट ठरले होते. त्यातून मालेगाव बाहेर पडले असले, तरी दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता मालेगावातील आरोग्य...

Recent Comments