Home शहरं पुणे पुण्यात पुन्हा लॉकडाऊन? जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण

पुण्यात पुन्हा लॉकडाऊन? जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं स्पष्टीकरण


पुणेः शहरात पुन्हा लॉकडाउन होणार असून, किराणा मालासह आवश्यक साहित्य खरेदी करावे, घरकामगाराना पगारी सुटी द्यावी, अशा प्रकारचे बनावट संदेश सोशल मीडियावर जिल्हाधिकारी यांच्या नावे पसरविण्यात येत आहेत. हे संदेश खोटे असून, संबंधितांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिला आहे.

सोशल मीडियावर पसरविण्यात येणाऱ्या या संदेशामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या संदेशामध्ये घरकामगारांना जमल्यास पगारी सुट्टी द्या, कुरिअर बंद करा, पुढील २० दिवसांसाठी किराणा माल भरून ठेवा, अशा प्रकारची खोटी माहिती पसविण्यात येत आहे. याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.

हा संदेश खोटा असून, त्यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. हा संदेश कोणीही पुढे पाठवू नये अन्यथा संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राम यांनी दिला आहे. शहरासह जिल्ह्यात पुन्हा लॉकडाउन लागू केले जाणार नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, सरकारनं अनलॉकचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईकरांनी पुन्हा एकदा गर्दी केल्याचं दिसून आलं आहे. मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मुंबईत पुन्हा एकदा
लागू करण्यात आले आहे. म्हणजेच पुन्हा एकदा मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली असून आता मुंबईकरांना रस्त्यावर गर्दी करता येणार नाहीये. १ जुलै मध्यरात्रीपासून ते १५ जुलै मध्यरात्री १२ पर्यंत जमावबंदी राहणार आहे.
आयुक्तालयानं पत्रकाद्वारे माहिती दिली आहेSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Mumbai Metro News: पहिलीच स्वदेशी मेट्रो २७ जानेवारीला मुंबईत – first Indigenous Metro Will Be In Mumbai On 27 January | Maharashtra Times

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईलाखो मुंबईकरांना प्रतीक्षा असलेल्या मेट्रो दोन अ आणि सात या मार्गावरील, स्वदेशी बनावटीच्या पहिल्याच मेट्रो ट्रेनच्या (रोलिंग स्टॉक) निर्मितीचे...

Recent Comments