130 कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने 59 मोबाईल अॅपवर बंदी घातली.
मुंबई, 30 जून : देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरण्याची शक्यता असलेली 59 चायनीज मोबाईल अॅपवर (Chinese mobile app) बंदी घालण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. तर काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नमो अॅपही बंद करण्याची मागणी केली.
‘130 कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने 59 मोबाईल अॅपवर बंदी घातली’ असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर केला.
‘ज्या प्रकारे हे 59 मोबाईल अॅपवर बंदी घातली आहे.त्याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अॅप देखील बंद केले पाहिजे’ अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
१३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाईल अॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे NaMo अॅप देखील बंद केले पाहिजे. #BanNaMoApp
— Prithviraj Chavan (@prithvrj) June 30, 2020
…म्हणून चीनी अॅपवर बदी
देशाच्या माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने कलम 69 A च्या अंतर्गत ही बंदी घातली आहे. चीनकडून सायबर अटॅकची भीती गेले काही दिवस व्यक्त करण्यात येत होती. त्यावर उपाय म्हणून या चिनी अॅप्सवर बंधनं नव्हे तर बंदीच घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कंपन्या या Appsच्या माध्यमातून कोट्यवधी फोन धारकांची माहिती चीनला पाठवित होत्या असं आढळून आलं आहे.
TikTok, Helo तुम्हीही वापरत असाल तर बंदीनंतर सगळ्यात आधी करा हे काम
या माहितीचा उपयोग या कंपन्या व्यावसायिक कामांसाठी करत असल्याचं आढळून आलं आहे. त्याचबरोबर फोन वापरणाऱ्याची सुरक्षाही धोक्यात येण्याची शक्यता होती.
पृथ्वीराज चव्हाणांचा शरद पवारांवर पलटवार
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात काँग्रेसचे साताऱ्यात आंदोलन करण्यात आले. काँग्रेस कमिटी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांच्या भारत-चीन प्रश्नी राजकारण न करण्याच्या मुद्द्यावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट करत शरद पवार यांच्या व्यक्तव्यावर पलटवार केला आहे.
गायींच्या कळपात एकट्या बदकानं घेतला पंगा, पुढे काय झालं पाहा VIDEO
‘चीनच्या प्रश्नावर राजकारण करू नये, हे खरे आहे. पण, विरोधी पक्षाला प्रश्न विचारण्याचा पूर्ण हक्क आणि अधिकार आहे. त्यामुळे आम्ही प्रश्न विचारणारच. आम्ही काही घरगुती कामासाठी प्रश्न विचारत नसून जनतेसाठी आणि जनतेचा आवाज म्हणून प्रश्न विचारत आहोत’ अशा शब्दात पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले.
तसंच, ‘सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे म्हणजे, विरोध करणे असं होत नाही. त्यांचे विचार जे काही असतील ते मान्य आहे. पण, आमचे विचार हे स्पष्ट आहे’ असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.
संपादन – सचिन साळवे
First Published: Jun 30, 2020 01:42 PM IST