Home शहरं नाशिक पोलिसांच्या आरोग्यासाठी ‘हेल्थ सिस्टीम’ कार्यान्वित

पोलिसांच्या आरोग्यासाठी ‘हेल्थ सिस्टीम’ कार्यान्वितशहर व जिल्ह्यातील पोलिसांना होणार फायदा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देश किंवा देशाचे रक्षक आपत्तीत असताना त्यांच्या मदतीसाठी तत्परतेने धावून जाणारा अभिनेता अक्षय कुमारने पोलिसांच्या आरोग्य रक्षणासाठी नाशिक पोलिसांसोबत नवा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी शहरातील काही सीएसआर उपक्रमांची साथ मिळवित ‘ऑनलाइन हेल्थ मॉनिटरिंग सिस्टीम’ विकसित केली आहे.

शहरातील दातार ग्रुपच्या कॅन कनेक्ट फाउंडेशनमार्फत सीएसआर उपक्रमांतर्गत पोलिस कर्मचाऱ्यांना रीस्ट बॅण्ड देण्याचा शुभारंभ गुरुवारी (दि. ११) करण्यात आला. या उद्घाटन सत्रात नाशिक पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि मदतकर्ते उद्योजकांसहीत व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे यात सहभागी होत अक्षय कुमारने नाशिक पोलिसांच्या कार्याची दखल घेतली आहे. या रिस्ट बॅण्डच्या माध्यमातून कोवीड-१९च्या विरोधात लढणाऱ्या पोलिस योद्ध्यांच्या आरोग्याच्या प्राथमिक नोंदी या तंत्रज्ञानाद्वारे ठेवता येणार आहेत. शरीराचे तापमान व पल्स रेट आदी गोष्टींच्या नोंदी घेऊन करोना युद्धात स्वत:च्या शरीराचे रक्षणदेखील याद्वारे करता येणार आहे. या नोंदींमध्ये आरोग्याचा असमतोल वाटल्यास संबंधित कर्मचाऱ्याचे विलगीकरण करणे या यंत्रणेमुळे सोपे होणार आहे. शहर व जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी कोवीड-१९ विरोधातील युद्धात अतुलनीय योगदान दिले असल्याचे या व्हीडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटले आहे.Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

‘त्यांची’ झेप देहविक्रीकडून आत्मनिर्भरतेकडे

: ग्राहकाची वाट पाहणे हे व्यावसायिकाचे नशीबच असते. त्याला कुणीही अपवाद नाही, अगदी देहविक्रय करणाऱ्या महिलादेखील. परंतु, करोनासारख्या साथीमुळे 'सुरक्षित वावरा'चा नारा...

Recent Comments