Home ताज्या बातम्या प्रताप सरनाईकांच्या बालपणीच्या मित्रानं MMRDAला लावला कोट्यावधींचा चूना? | News

प्रताप सरनाईकांच्या बालपणीच्या मित्रानं MMRDAला लावला कोट्यावधींचा चूना? | News


टॉप्स सिक्युरीटीचा काळा पैसा अमित चंडोळेमार्फत कोणत्या राजकीय नेत्याला मिळत होता?

ठाणे, 26 नोव्हेंबर: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena Leader Pratap Sarnike) यांचे निकटवर्तीय आणि सरनाईक परिवाराच्या कंपन्यामध्ये महत्त्वाच्या पदावर असलेले अमित चंडोळे (Amit Chandole) यांना अंमलबजावणी संचनालयानं (ED) ताब्यात घेतलं आहे. धक्कादायक म्हणजे अमित चंडोळे यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (MMRDA) कोट्यावधी रुपयांचा चूना लावल्याचा आरोप झाला आहे.

अमित चंडोळे कोट्यावधींचे गैरव्यवहार करत होते? त्यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे? त्यांनी MMDRA ची देखील फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. टॉप्स सिक्युरीटीचे सर्वेसर्वा राहूल नंदा यांच्यासाठी देखील अमित चंडोळे हेच MMRDA मध्ये एजंट म्हणून काम पाहात होते. राहूल नंदा आणि अमित चंडोळेची भेट कोणी करुन दिली? राहूल नंदांसोबत लंडनमध्ये कोणी पैसे गुंतवले होते? असं प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

हेही वाचा..पंतप्रधान मोदींना पुण्यात अडवणार, मराठा क्रांती ठोक मोर्चानं घेतला मोठा निर्णय

टॉप सिक्युरीटीचे व्हाईस चेअरमन रमेश अय्यर यांनी टॉप्स सिक्युरीटीमध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी मुंबईतील यलोगेट पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली होती. त्यानुसार राहूल नंदा यांच्याकरता MMRDA तील व्यवहार मध्यस्थी म्हणजेच एजंट म्हणून 2014 या वर्षापासून अमित चंडोळे आणि संकेत मोरे नावाची व्यक्ती करत होती. MMRDA करता जवळपास 300 ते 500 सिक्युरीटी गार्डची आवश्यकता होती. हे गार्डस अमित चंडोळे आणि संकेत मोरे यांनी टॉप्स सिक्युरीटीच्या माध्यमातून MMRDA पुरवले होते. मात्र, प्रत्यक्षात 70 टक्के गार्ड पुरवून बनावट कागदपत्रांच्या आधारे MMRDA तून 100 टक्के गार्डचे बिल काढलं जात होतं. या बदल्यात संकेत मोरे आणि अमित चंडोळे यांना राहूल नंदा यांच्याकडून दर महिन्याला 50 हजार रुपये, प्रती गार्ड 500 रुपये आणि 30 टक्के गार्डचे बनावट कागदपत्रे सादर करुन MMRDA कडून घेतलेल्या पैशांतून 50 टक्के रक्कम म्हणजे दर महिना संकेत मोरे आणि अमित चंडोळे या दोघांना 4 ते 5 लाख रुपये राहूल नंदा द्यायचे. मात्र हे पैसे थेट राहूल नंदा देत नसून MMRDA चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी निरज बिजलानी हे देत होते. हे पैसे निरज बिजलानी बॉम्बे कॅफे, मॅसेज बंदर, मुंबई 09 या कॅफेमध्ये देत असत.

2017 ते 2020 या काळाच निरज बिजलानी यांनी 2 कोटी 36 लाख रुपये कमिशन पैकी 90 लाख रुपये रोख अमित चंडोळे यांना बॉम्बे कॅफे येथे दिले होते तर उरलेले 1 कोटी 46 लाख रुपये राहूल नंदा यांनी टॉप्स सिक्युरीटीच्या खात्यातून अमित चंडोळे यांच्या खात्यात वळते केले होते. अशा प्रकारे वेगवेगळ्या कामाचे कोट्यावधी रुपये अमित चंडोळेला राहूल नंदा यांनी दिले होते.

हेही वाचा..मनसैनिकाच्या डोक्यात भर चौकात घातली होती गोळी, पोलिसांनी आवळल्या एकाच्या मुसक्या

रमेश अय्यर यांच्या तक्रारीवरून अनेक प्रश्न उपस्थित…

-अमित चंडोळे सारखा माणूस उद्योगपती राहूल नंदा यांच्या थेट संपर्कात कोणामुळे आला?

-MMRDA मध्ये अमित चंडोळे कोणत्या राजकीय नेत्याचे नाव वापरायचा?

-MMRDA तून कोणत्या राजकीय नेत्याच्या सांगण्यावरून अमितला खोट्या बिलांचे पैसे मिळायचे?

-अमित चंडोळे कोणत्या राजकीय नेत्याच्या संपर्कात होता?

– कोणत्या नेत्याचा अमित चंडोळेवर वरदहस्त होता?

-टॉप्स सिक्युरीटीचा काळा पैसा अमित चंडोळेमार्फत कोणत्या राजकीय नेत्याला मिळत होता?


Published by:
Sandip Parolekar


First published:
November 26, 2020, 5:34 PM ISTSource link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

sharad pawar on madhukar pichad: Sharad Pawar: गेल्या निवडणुकीत काहींच्या अंगात आलं होतं!; पवारांनी ‘या’ नेत्याची काढली पिसं – the behavior of some of...

नगर: ‘मागील विधानसभा निवडणुकीच्यावेळी काही नेत्यांच्या अंगात आले होते. त्यामुळे ते चमत्कारिक वागले. ज्यांना पक्षाने भरभरून दिले, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडली. मात्र, शेवटी...

Ajinkya raahne: IND vs AUS : विराट कोहलीला कर्णधारपद दिल्यानंतर अजिंक्यने पहिल्यांदाच व्यक्त केली प्रतिक्रीया, म्हणाला… – ind vs aus : ajinkya rahane given...

नवी दिल्ली, IND vs AUS : अजिंक्यने भारताला ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक विजेतेपद मिळवून दिले. पण त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी अजिंक्यकडून भारतीय संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात...

Recent Comments