Home ताज्या बातम्या प्रत्यक्ष आयुष्यात कसा होता सुशांत सिंह राजपूत? त्याचे कधीही न पाहिलेले VIDEO...

प्रत्यक्ष आयुष्यात कसा होता सुशांत सिंह राजपूत? त्याचे कधीही न पाहिलेले VIDEO Sushant singh rajput unseen video share by creative manager mhpl | News


सुशांत सिंह राजपूतचे (Sushant singh rajput) बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील.

मुंबई, 20 जून : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर त्याचे बरेच व्हिडीओ सोशल मीडियावर फिरू लागले. त्याच्या चित्रपटातील व्हिडीओ असो, पुरस्कार सोहळ्यातील व्हिडीओ असो किंवा त्याने केलेल्या चांगल्या कामांचे व्हिडीओ असो. मात्र आता सुशांतचे असे काही व्हिडीओ समोर आलेत, जे तुम्ही कधीच पाहिले नसावेत.

सुशांत सिंह राजपूतचा क्रिएटिव्ह मॅनेजर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पिठानीने सुशांतचे व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेत. यामध्ये सुशांत प्रत्यक्ष आयुष्यात नेमका कसा होता, याचा अंदाज हे व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्याला येईल.

यातील पहिल्या व्हिडीओत सुशांत सिंह कार चालवताना आहे. ज्यामध्ये तो आपला पहिला चित्रपट काय पो छे मधील डायलॉग बोलतो. सुशांतने इंजिनीअरिंग सोडून अभिनय क्षेत्र निवडलं. पवित्र रिश्ता या टीव्ही सीरिअलमधून त्याने प्रत्येकाच्या मनात घर केलं. यानंतर त्याने बॉलावूडमध्येही पदार्पण केलं. काय पो छे हा त्याचा पहिला चित्रपट. या चित्रपटामुळे खऱ्या अर्थाने त्याचं अभिनेता होण्याचं स्वप्न साकार झालं. कार चालवताना सुशांत या व्हिडीओत याच चित्रपटातील डायलॉग बोलताना दिसतो आहे. त्यावेळी खूप एनर्जिटिकही आहे.
दुसरा व्हिडीओ हा सुशांतच्या घरातील आहे. ज्यामध्ये सुशांत आणि त्याच्या मित्रांसह म्युझिकमध्ये खूप छान दंग झाला आहे. सुशांतला म्युझिकचीही किती आवड होती, हे यातून दिसून येतं.
सुशांतचा सर्वात जवळचा मित्र म्हणजे त्याचा कुत्रा. सुशांतच्या जाण्याने या कुत्र्यालाही धक्का बसला आहे, सुशांतच्या मृत्यूनंतर तो सुशांतचा फोटो आपल्याजवळ घेऊन बसलेला असतो. आतापर्यंत या दोघांचे आपण अनेक व्हिडीओ पाहिलेत. मात्र हा व्हिडीओ तुम्ही पाहिलेला नसेल, ज्यामध्ये तो कुत्र्याच्या पिल्लांसह मस्ती करताना दिसतो आहे.
14 जूनला सुशांतने आत्महत्या केली. तो डिप्रेशनमध्ये होता असं सांगितलं जात आहे. मात्र त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांचा तपास सुरू आहे. सतत चेहऱ्यावर हसू ठेवणारा, दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरही हसू आणणाऱ्या, नेहमी सकारात्मक राहणाऱ्या, उराशी स्वप्नं बाळगून आणि ती पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या सुशांतने असं अचानक आपलं जीवन संपवलं त्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.

संपादन – प्रिया लाड

First Published: Jun 20, 2020 05:25 PM IST

Source link

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

television news News : कपिल शर्मानं मौन सोडलं;पडद्यावरच्या ‘भीष्म पितामह’यांना दिलं ‘हे’ उत्तर – kapil sharma finally responds to mukesh khanna’s attack on his...

मुंबई: कॉमेडी किंग कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये अश्लिल भाषेचा वापर करत हुल्लडबाजी सुरु असते , अशी टीका अभिनेते मुकेश खन्ना यांनी...

Rishabh Pant Is Recover From Injury And He Will Be Play In Todays Match Against Kings Eleven Punjab – IPL2020: दिल्लीसाठी गूड न्यूज, पंजाबविरुद्धचा...

दुबई : पंजाबबरोबरचा सामना सुरु होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला एक आनंदाची बातमी मिळाली आहे. दिल्लीच्या संघात एका धडाकेबाज खेळाडूचे आज पुनरागमन होऊ शकते,...

Recent Comments